Headlines

Dispute in Shiv Sena UBT Party Workers in Front of Uddhav Thackeray At Matoshree Bungalow


उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या दोन गटात शाब्दिक राडा झाल्याची माहिती मिळत आहे. या राड्यामुळे उद्धव ठाकरे हे आपल्या पदाधिकाऱ्यांवर संतापल्याची माहिती समोर येत आहे.

Uddhav Thackeray
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या समोरच ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांचे दोन गट आमनेसामने आल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही गटात शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

ठाण्यात पक्ष संघटना आणखी बळकट करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यावेळी आधीचे पदाधिकारी आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा झाली. पण उद्धव ठाकरे यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांच्या दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. याच हकालपट्टीच्या मुद्द्यावरुन दोन गटात वाद झाल्याची माहिती आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील ज्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती त्यांना देखील आजच्या बैठकीत बोलावण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्याकडून विषय समजून घेतला जात होता. पण यावेळी दोन गट आमनेसामने आले आणि त्यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची माहिती आहे.

बैठकीला कोण-कोण होते उपस्थित?

या बैठकीला ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी आमदार विलास पोतनीस, माजी खासदार विनायक उपस्थित होते. या बैठकीत ठाण्याप्रमाणेच कळव्याचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापले

या बैठकीत दोन गटात वाद झाला. उद्धव ठाकरे यांच्यासमोरच अशाप्रकारे वाद झाल्याने ते संतापले. “अभिजीत दिपके यांच्यासारखा तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देतोय. तरुणांचं नेतृत्व करत आहे आणि तुम्ही आपापसात भांडण करत आहात. तुमच्या या वागण्याला अर्थ आहे का? “, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्यांनी असं काही झालेलंच नाही, असं सांगण्यात आलं.

उद्धव ठाकरे पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील

राज्यात सध्याच्या घडीला कोणत्याही निवडणुका नाहीत. तीन वर्षांनी लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका होतील. त्यामुळे आता पक्ष संघटना मजबूत करण्याकडे उद्धव ठाकरे यांचा कल आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने निशाणा साधला जातोय.

वेगवेगळ्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक मोठं आंदोलन उभं करण्याबाबत उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आधी पक्ष संघटना मजबूत केली जात आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा