Headlines

Vijay Varma : ‘त्याने मला चुकीचा स्पर्श केला, खूप किळसवाणं वाटलं’, विजय वर्मानं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव


Vijay Varma On Casting Couch : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

Vijay Varma Casting Couch Experience
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचचे प्रकार अनेकदा होत असतात. अनेक कलाकारांना धक्कादायक अनुभवसुद्धा आले आहेत. बॉलिवूड अभिनेता विजय वर्मानं इंडस्ट्रीत स्वतःचं नाव कमावलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्यानं त्याच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितलं असून कास्टिंग काऊचचा अनुभवही सांगितला आहे.

कास्टिंग काऊचबद्दल विजय वर्माचा खुलासा

विजय वर्मानं सांगितलं की, हैदराबादमध्ये मॉडेलिंग करताना, एका मॉडेल कोऑर्डिनेटरनं त्याच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. विजय म्हणाला की, ‘तो मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होता. मी म्हणालो, ‘हे काय आहे? तू काय करतोयस?’ मला खूप किळस आली.’ अभिनेत्यानं सांगितलं की, या घटनेमुळे तो खूप निराश झाला होता, परंतु नंतर त्यानं ठरवलं की जर त्याला अभिनयात करिअर करायचं असेल, तर त्याला अशा अडचणींचा धैर्यानं सामना करावा लागेल.
Maharashtra TimesSaorabh Choughule : ‘तू डोंबिवलीचं नाव घेतलंस, मराठी मुलगा शून्यातून वर आला आणि आज स्वतःला सिद्ध केलं’, अजिंक्य राहणेसाठी मराठी अभिनेत्याची खास पोस्ट
मॉडेलिंगच्या पहिल्या वाईट अनुभवानंतर, विजय वर्माने अभिनयाची निवड केली. अभिनेता म्हणाला, ‘मी हैदराबादमधील सुत्रदार स्कूल ऑफ ॲक्टिंगमध्ये गेलो आणि तिथं सांगितलं की, मला अभिनय शिकायचा आहे. पण त्यांनी मला नकार दिला. ते म्हणाले की यासाठी कमिटमेंट आवश्यक आहे. हे दोन दिवसांचं काम नाही. मला वाटलं की ते मला संधी देत नाहीत.’ प्रखर गुप्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये विजय वर्मा बोलत होता.

Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद

त्यानंतर विजय वर्मानं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये प्रवेशासाठी अर्ज केला, पण पहिल्या प्रयत्नात तो अयशस्वी ठरला. पण, त्यानं हार मानली नाही आणि दुसऱ्या प्रयत्नात त्याची निवड झाली. FTII मध्ये, त्यानं राजकुमार राव आणि जयदीप अहलावत यांसारख्या कलाकारांसोबत अभिनयाचं शिक्षण घेतलं.
Maharashtra TimesKushal Badrike : ‘रितेश सरांमुळे ‘चला हवा येऊ द्या’चा जन्म झाला’, कुशल बद्रिकेनं सांगितला किस्सा

विजय वर्माचे सिनेमे

विजय वर्मा शेवटचा विभू पुरी दिग्दर्शित ‘गुस्ताख इश्क’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, फातिमा सना शेख आणि शरीब हाश्मी यांनीही काम केलं होतं. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्माता म्हणून पदार्पण केलं. याशिवाय, विजय अलीकडेच ‘मटका किंग’ या वेब सीरिजमध्येही दिसला होता.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा