महागाईचा बॉम्ब फुटणार! सर्वसामान्यांच्या खिशाला युद्धाची झळ; सणासुदीच्या तोंडावर रोजच्या वापरातील वस्तू महागणार, पाहा यादी
अमेरिका-इराण या दोन्ही देशात सुरु असणारे तणाव कमी झाल्यामुळे क्रूड ऑइल दर 88 डॉलर प्रति बॅलरपर्यंत घसरले आहे. परंतु, भारतीय बाजारपेठेत पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबई शहरातील आजचा पेट्रोल दर 111.21 रुपये आहे. कालही हा दर 111.21 रुपयेच होता त्यामुळे मुंबईत पेट्रोलच्या दरात काहीच बदल झालेला नाही. देशातील इतर शहरातील आजचा पेट्रोल दर पाहिला तर दिल्लीत आज पेट्रोलचा भाव 102.12 रुपये आहे. कोलकाता शहरात 113.43 रुपये, चेन्नईत 107.77 रुपये तर बंगळुरूमध्ये 111.68 रुपये आहे. या शहरातील कालचे पेट्रोलचे दर पाहिले तर पेट्रोलच्या दरात आज काहीही चढउतार झालेला नाही.
मुंबई शहरातील आजचे डिझेलचे दर 97.83 रुपये आहे. मुंबई शहरातील कालचे डिझेलचे दर पाहिले तर आज शहरातील डिझेलच्या दरात कोणताही चढउतार दिसत नाहीये. देशातील इतर शहरातील आजचा डिझेल दर पाहिला तर दिल्लीत आज डिझेलचा भाव 95.20 रुपये आहे. कोलकाता शहरात 99.82 रुपये, चेन्नईत 99.55 रुपये तर बंगळुरूमध्ये 99.56 रुपये आहे.
पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याचे कारण काय?
जेव्हापासून जगभरात युद्धांचे वातावरण आहे तेव्हापासून कच्च्या मालाच्या किमतीत नेहमीच वाढ दिसून आली आहे. याचा फटका मे महिन्यात भारताला मोठ्या प्रमाणात बसला आहे. एकाच महिन्यात चार वेळा इंधनांचे दर वाढले. देशातील ऑइल कंपन्यांना एकाचवेळी 1000 कोटींच्या नुकसानाला सामोरे जावे लागले होते. एप्रिल 2026 ते जून 2026दरम्यान देशातील रिफायनरी कंपन्यांना एकूण 2661.30 कोटींचे नुकसान झाले होते.
भविष्यात दर कमी होण्याची शक्यता!
जर अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी झाले आणि परिणामी कच्च्या मालाची किंमत कमीच राहिली तर याचा परिणाम भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमतीवरही होऊ शकतो. कच्च्या मालाची किंमत घसरत राहिली तर भारतात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवर आळा बसू शकतो.
