Headlines

Supreme Court Decision About PF Of Employees; सुप्रीम कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या हक्कांना दिला सुरक्षाकवच! कंपनी दिवाळखोर जरी निघाली तरी PF कुठेही जाणार नाही


भारतीय सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी वर्गासाठी एक सुखद बातमी दिली आहे. कर्मचारी वर्गासाठी एक विशेष निर्णय भारतीय सर्वोच्च न्यायालयाने जारी केला आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाने कर्मचारी वर्गाच्या PF संदर्भात निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या PF ला सुरक्षाकवच मिळाला आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग त्यांच्या कंपनीविषयी आता कसलीही भीती न बाळगता उत्साहाने कामे करू शकणार आहेत. कारण जरी त्यांची कंपनी दिवाळखोरझाली तरी त्यांचा PF मधील एक रुपयाही कुठे जाणार नाही आहे.

Maharashtra TimesIndia Demand Fall Explained: सराफा बाजारात उलटफेर, उच्चांकावर गेलेल्या सोन्याचा हव्यास मिटला; भारतीयांची दागिन्यांकडे पाठ, बदलता गोल्ड ट्रेंड समजून घ्या
कर्मचाऱ्यांचा PF, कर्मचाऱ्यांचा हक्क!

संबंधित निर्णय हा दिवाळखोर कंपन्यांसंबंधित आहे. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी कंपनी एका बँकेकडून मोठ्या रक्कमेत कर्ज घेते पण ते फेडण्यात ती कंपनी पुढे असक्षम ठरत असेल तर ती कंपनी नियमांप्रमाणे दुसऱ्या इच्छुक कंपनीद्वारे टेकओव्हर केली जाते. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, गुंतवणूकदार कंपनीला आधीच्या कर्मचाऱ्यांचाही विचार करावा लागेल. त्या कर्मचाऱ्यांचा हक्क असलेला त्यांचा PF त्यांना मिळावा याची पूर्ण खबरदारी तसेच जबाबदारी गुंतवणूकदार कंपनीला घ्यावी लागेल. मग जर आधीच्या कंपनीमुळे PF चा काही व्याज बाकी असेल किंवा त्यावर दंड लागून असेल तर तीदेखील जबाबदारी गुंतवणूकदार कंपनीला घ्यावी लागते.

कर्मचाऱ्यांच्या PF वरील व्याज आणि दंडाच्या भरपाईला जबाबदार कोण?

जेव्हा एखादी कंपनी कर्मचाऱ्यांचा PF वेळेवर EPFO कडे जमा करत नाही, तेव्हा EPFO अशा कंपनींवर दंड ठोठावते तसेच PF EPFO कडे जमा करण्यास केलेल्या विलंबामुळे व्याजही वाढत जातो. आधी तर या रक्कमांची भरपाई करण्यास सर्वस्वी जबाबदार पूर्वीची कंपनी असते. परंतु, थकबाकीमुळे जेव्हा ती कंपनी IBC मध्ये जाते तेव्हा त्यात गुंतवणूक करणारी नवी गुंतवणूकदार कंपनी या सर्व रक्कमेची भरपाई करण्यास जबाबदार राहते. त्यामुळे वाढते व्याज आणि दंड याचा तणाव कर्मचाऱ्यांनी घेण्याची काहीच गरज नसते, कारण ती रक्कम भरण्यासाठी कंपनी जबाबदार असते.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा सामान्य जनतेला काय फायदा?

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना हक्कांना एक सुरक्षा कवच आले आहे. एकंदरीत, कंपनी दिवाळखोर झाली तरी त्यांच्या PF वर काहीच धोका नसेल. त्यांना त्यांचा हक्क मिळणारच! परंतु, जर कंपनी दिवाळखोर होण्याअगोदर EPFO ने कंपनीच्या व्याजासंबंधित तसेच दंडासबंधित कोणताही अंतिम आदेश पास केला नसेल तर गुंतवणूकदार कंपनी आधीच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या PF कडून तोंडही वळवू शकते.

EPFO काय काम करते?

EPFO (Employee’s Provident Fund Organisation) देशातील कर्मचाऱ्यांचे PF जमा करणारी संस्था आहे. दरवर्षी सरकारी दरानुसार त्यावर व्याज जमा करणे EPFO चे काम असते. तसेच सर्व कर्मचाऱ्यांची PF खाती या संस्थेकडे असतात. तसेच एखाद्या संस्थेतून रिटायर झालेल्या तसेच पात्र झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संबंधित गोष्टीही EPFO द्वारेच सांभाळले जाते.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत