Kushal Badrike : कुशल बद्रिकेनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ या शोची सुरुवात कशी झाली, यामागचा किस्सा सांगितला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘ चला हवा येऊ द्या ‘ या कार्यक्रमानं अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मराठी कलाकारांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली. सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान यांसारखे सुपरस्टार ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये आलेले. खरंतर ‘चला हवा येऊ द्या’ची सुरुवात रितेश देशमुखमुळे झालेली. याबद्दल कुशल बद्रिकेनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
कुशल बद्रिकेनं सांगितला किस्सा
मुलाखतीदरम्यान कुशल बद्रिके म्हणाला की, ‘मला रितेश देशमुख सरांना थँक्यू म्हणायचं आहे. कारण आमचा शो ‘लय भारी’ चित्रपटाच्या निमित्तानं सुरू झाला होता. तोच या शोचा पहिला एपिसोड होता. ‘लय भारी’ सिनेमाला प्रमोट करण्यासाठी आपण एक छोटा इव्हेंट करूयात असं रितेश सरांचं ठरलं होतं. मी, निलेश आणि भाऊ असं आम्ही तिघंजण मिळून तो पहिला इव्हेंट करणार होतो. त्यानंतर मग म्युझिकसाठी तुषार देवल जॉइन झाला. तो इव्हेंट रितेश सरांना इतका आवडला की, ते म्हणाले, ’तुम्ही हा शो सुरू का नाही करत?’ याचाच शो सुरू करा.’ Kangana Ranaut : ‘तरुणांची दिशाभूल करू नका, त्यासाठी मला लाखो रुपये मिळालेले’ जुन्या सिनेमातील व्हायरल व्हिडिओवर कंगना रणौतचा संताप ‘झी मराठीनं ही गोष्ट गांभीर्याने घेतली आणि मग ‘चला हवा येऊ द्या’चा जन्म झाला. याला कारणीभूत रितेश सर आहेत. रितेश सरांमुळे ‘चला हवा येऊ द्या’ जन्माला आलं. त्यामुळे ते दिसल्यावर माझ्या मनात कायम ग्रेटफूल ही भावना येते. एक काळ असा होता, जर तुम्हाला महाराष्ट्रात तुमचा सिनेमा पोहोचवायचा असेल तर ‘चला हवा येऊ द्या’शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे बॉलिवूडचे अनेक कलाकार ‘चला हवा येऊ द्या’च्या रंगमंचावर येऊन गेले होते. या शोमुळे आम्हालाही त्यांच्याबरोबर संवाद साधता आला, त्या सगळ्या कलाकारांना भेटता आलं. मग हळुहळू मला समजलं ते लोक पण आपल्यासारखेच आहेत.’ असं कुशलने पुढे सांगितलं.
Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद
‘शाहरुख खानबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला की, ‘पण, शाहरुख जेव्हा पहिल्यांदा सेटवर आला होता, त्याचा काय रुबाब होता, काय सांगू मी तुम्हाला! मला खरंच खूप जास्त भारी वाटलं होतं. खूप मजा आली होती. मी त्याला सुरुवातीला खिडकीतून लपत-लपत पाहिलं होतं. खरंच एक वेगळीच फिलिंग होती.’ ‘सर्व काही’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुशल बद्रिकेनं हा किस्सा सांगितला आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा