Headlines

Kirti Kulhari Cyber Fraud Via Credit Card Filed Police Complaint ; Kirti Kulhari Cyber Fraud : उरी फेम अभिनेत्री सायबर फ्रॉडची शिकार, क्रेडिट कार्डद्वारे अचानक परदेशी व्यवहाराचे नोटीफिकेशन, लाखोंचा गंडा


Kirti Kulhari Cyber Complaint : उरी फेम अभिनेत्रीसोबत धोका करुन तिच्या अकाउंटमधले लाखो रुपये लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. अभिनेत्री या प्रकरणी आंबोली पोलीस स्थानकात रितसर पोलीस तक्रारही नोंदवली आहे.

kirti kulhari
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सध्या इंटरनेटचा वापर हा प्रत्येक गोष्टीत केला जात असल्याने त्यामार्फत फसवणूक करण्याचे प्रकारही भरपूर वाढले आहेत. एखाद्या गोष्टीवर क्लिक झालंच तर त्यामुळे खात्यातील कित्येक रुपये अचानक लंपास होतात. या अशा प्रकरणाला केवळ सर्वसामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रिटीही बळी पडतात. नुकताच एका बॉलिवूड अभिनेत्रीबाबत हा प्रकार समोर आला आहे.

अभिनेत्री किर्ती कुल्हारीची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात भामट्यांनी तिच्या मोबाईल फोन आणि क्रेडिट कार्डचा अनधिकृत ताबा मिळवून अवघ्या काही मिनिटांत 2,43,852 रुपयांची फसवणूक केली. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

Maharashtra TimesGirish Oak : दुसऱ्या बायकोला व्हिलन ठरवलं, घटस्फोटापूर्वी माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे हे मला माहित नव्हतं, तिथेच माझं चुकलं! गिरीश ओक यांनी व्यक्त केलेली खंत

फसवणूक लक्षात येताच अभिनेत्रीने क्रेडिट कार्ड ब्लॉक केले

‘आयएएनएस’च्या वृत्तानुसार, किर्ती हिने या घटनेबाबत एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, ही सायबर फसवणुकीची घटना रात्री 9.31 च्या सुमारास घडली. त्यावेळी ती अंधेरी पश्चिम येथील ‘फन रिपब्लिक मॉल’जवळील ‘सिनेपोलिस’ थिएटरमध्ये होती. याच दरम्यान, तिला तिच्या मोबाईलवर एक अलर्ट मेसेज आला, ज्यामध्ये तिच्या क्रेडिट कार्डचा वापर करून ‘एरोमेक्सिको एअरलाईन्स’सोबत 2525 अमेरिकन डॉलर्सचे व्यवहार झाल्याचे दाखवण्यात आले होते.

Maharashtra TimesSudesh Berry : PM मोदी विष्णूंचा अवतार, मला त्यांच्या पायाचे पाणी प्यायचेय, CJP वाले लायकी नसलेले लोक! बॉर्डर फेम अभिनेत्याचे विधान चर्चेत
एका अनोळखी आणि संशयास्पद परदेशी व्यवहाराची नोटिफिकेशन दिसताच, अभिनेत्रीने अजिबात वेळ न दवडता बँकेच्या टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. चौकशीनंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तिला कळवले की, तिच्या क्रेडिट कार्डचा वापर करून चार स्वतंत्र आणि मोठे अनधिकृत व्यवहार झाले होते; परिणामी, सुरक्षेचा उपाय म्हणून ते कार्ड त्वरित ब्लॉक करण्यात आले.

अभिनेत्रीचे क्रेडिट कार्ड हॅक

पोलिसांना दिलेल्या जबाबात अभिनेत्रीने नमूद केले की, तिच्या क्रेडिट कार्डचा पासवर्ड अत्यंत गुप्त होता आणि तिने तो कोणाशीही शेअर केला नव्हता. त्यामुळे डिजिटल मालवेअर किंवा स्पायवेअरच्या माध्यमातून तिचा फोन आणि कार्ड हॅक झाले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.


प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, आंबोली पोलिसांनी एका अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेलची टीम बँकेचे संदर्भ क्रमांक आणि डिजिटल फूटप्रिंट्सच्या आधारे गुन्हेगारांचा शोध घेत आहे.

किर्ती कुल्हारी सिने कारकिर्द

अभिनेत्रीच्या करियरबद्दल बोलायचे झाल्यास, कीर्ती कुल्हारीने ‘पिंक’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’, ‘इंदू सरकार’, ‘मिशन मंगल’ आणि ‘क्रिमिनल जस्टिस’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. ती अलीकडेच ‘शेखर होम’ या सीरिजमध्ये झळकली होती.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा