Headlines

Nanded District Central Cooprative Bank Election Ashok Chavhan Shetkari Vikas Panel Wins 21 Seats; नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत अशोक चव्हाणांचा डंका; 23 पैकी 21 जागांवर शेतकरी विकास पॅनलचा कब्जा, नेत्यांची घराणेशाही कायम


Nanded District Central Cooprative Bank Election : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकतर्फी निवडणुकीमध्ये खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील बहुपक्षीय शेतकरी विकास पॅनेलने 23 पैकी 21 जागा जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं.

Nanded District Central Cooprative Bank Election
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने 23 पैकी तब्बल 21 जागांवर दणदणीत विजय मिळवत बँकेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. अशोक चव्हाण यांचा दबदबा असला तरी घराणेशाहीचा कित्ता मात्र राजकीय नेत्यांनी कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. बिनविरोध निवडून आलेल्या आणि निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांमध्ये बहुतांश जण आजी माजी आमदार व त्यांचे सुपुत्र, पत्नी आणि खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सत्ता मिळणासाठी सत्ताधिकारी आणि विरोधक यांनी मतभेद दूर करून एकत्र आल्याचे देखील या निवडणुकीत पहायला मिळाले. मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू मानली जाते मात्र, राजकीय नेत्यांचे वर्चस्व त्यातच घराणेशाही कायम असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

चिखलीकर यांची प्रतिष्ठापणाला

नांदेड मद्यवर्ती सहकारी बँकेच्या 23 संचालक पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात 11 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यात भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका आमदारासह इतर सात जणांची बिनविरोध निवड झाली होती. 12 जागेसाठी रविवारी मतदान घेण्यात आले . मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात शेतकरी विकास पॅनलचे 23 पैकी 21 संचालक निवडून आले तर संगीता पाटील डक आणि कृष्णा पाटील आष्टीकर या दोन अपक्ष उमेदवारांचा विजय झाला. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कॉग्रेस खासदार रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. विशेष म्हणजे बँकेत सत्ता मिळवण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येत शेतकरी विकास पॅनल निर्माण केले. यात आजी माजी आमदारासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. या सर्वांचा विजय झाला आहे. दरम्यान माजी आमदार माधव पाटील जवळगावकर यांचा एक मताने विजयी झाले. तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते ज्योतिबा खराटे यांचा दोन मतांनी पराभव झाला. दरम्यान या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी हातात हात घालून निवडणूक लढवल्याने पॅनलच्या उमेदवारांचा एकतर्फी विजय सुकर झाला अशी चर्चा सुरु आहे.
Maharashtra TimesPune Crime News : आणखी एक सिया अन् नवा स्कॅम, पुण्याच्या मुळशीतील पोलीस पाटलांची फसवणूक; 10 कोटींचं आमिष अन्…

घराणेशाहीचा पुन्हा एकदा बोलबाला

शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या या मध्यवर्ती बँकेत बिनविरोध आणि बहुमताने निवडून आलेल्या संचालकांमध्ये बहुतांश आजी-माजी आमदार, खासदार आणि त्यांच्या थेट कुटुंबातील सदस्यांचीच वर्णी लागली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि शेतकरी वर्गात या घराणेशाही बाबत जोरदार चर्चा रंगली आहे. आपली आणि आपल्या नातेवाईकांची वर्णी लागण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार तुषार राठोड आणि आमदार भीमराव केराम यांची बिनविरोध निवड झाली होती. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणारी अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. या बँकेवर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींपेक्षा राजकीय घराण्यातील नेत्यांचाच भरणा अधिक झाल्याने, ही बँक खरोखरच सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार की बड्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे केंद्र बनणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

विजयी झालेले दिग्गज व नेत्यांचे नातेवाईक

प्रताप पाटील चिखलीकर (आमदार राष्ट्रवादी अजित पवार गट), तुषार राठोड (आमदार भाजप), भीमराव केराम (आमदार भाजप), पूनम पवार (आमदार राजेश पवार यांच्या पत्नी), माधव जवळगावकर (माजी आमदार), प्रणिता पाटील चिखलीकर (आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या व भाजप प्रदेश महामंत्री), कृष्णा पाटील आष्टीकर (खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र), मीनल खतगावकर (माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई), श्रीनिवास चव्हाण (काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण यांचे सख्ये काका), कैलास गोरठेकर (दिवंगत माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे सुपुत्र), सुशीला बेटमोगरेकर (माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांच्या पत्नी) आदींचा समावेश आहे.
Maharashtra TimesFarmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पात्र असतानाही कर्जमाफी मिळाली नसल्यास कुठे करावी तक्रार? जाणून घ्या…

काँग्रेस खासदारावर पक्षातील पदाधिकारी नाराज

जिल्हा बँकेची निवडणूक ही राजकीय पक्षाची निवडणूक नसली तरी नेत्यांचे विशेष लक्ष लागले होते. या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस रवींद्र चव्हाण हे स्वतंत्र्य पॅनल उभे करून भाजपाला आवाहन देणार अस वाटतं होते, मात्र त्यांनी अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हातात हात मिळवून पॅनलच्या माध्यमातून आपले उमेदवार उभे केले. यात बहुतांश कुटुंबियांतील सदस्यांना संधी देण्यात आली. काँग्रेसकडे उमेदवार असताना देखील खासदाराने अनेकांना उमेदवारी मागे घ्यायला लावली होती. काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील पदाधिकारी नाराज नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण यांनी काकाला बिनविरोध निवडून आणण्यासाठी आपली उमेदवारी मागे घेतली होती.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा