Headlines

Aishwarya Narkar : ‘या वयात शोभतं का?’, सोशल मीडियावर ट्रोल; ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, ‘लोक काय म्हणतील हा मुद्दाच आयुष्यात ठेवू नका’


Aishwarya Narkar On Trolling : ऐश्वर्या नारकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.

Aishwarya Narkar On Trolling
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ऐश्वर्या सोशल मीडियावरही कायम सक्रीय असतात. ऐश्वर्या त्यांचे पती अविनाश नारकर यांच्यासोबत रील्स शेअर करतात. मात्र, त्यांना ट्रोल केलं जातं. अशातच आता यावर नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्या यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

‘स्वतःसाठी आयुष्य जगा’

मुलाखतीदरम्यान ऐश्वर्या नारकर म्हणाल्या की, ‘बऱ्याच वेळा आमच्या पोस्टच्या कमेंट्समध्ये अनेकजण लिहितात, काय तुम्हाला या वयात हे शोभतं का वगैरे. तर मला असं वाटतं की, आपल्या आयुष्याची ५० वर्षे आधीच झालीयेत. आपण काय सगळेच शंभर वर्ष जगणार नाही आहोत. ७५ टक्के आयुष्य गेलंय, आता २५ टक्के उरलंय. त्यामुळे, थोडं स्वत:साठी जगून घ्या ना. पुढे जाऊन आपल्याला मनुष्य जन्म मिळणार आहे की नाही. हे सुद्धा माहिती नाहीये.’

MaTa Sanman 2026 : तितिक्षा आणि सिद्धार्थच्या आयुष्यातले चॅट जीपीटी कोण?

ऐश्वर्या नारकर पुढे म्हणाल्या की, ‘बरेच जण असाही विचार करतात अरे या वयात आपल्याला हे सूट होणार नाही, ते सूट होणार नाही. पण, तुम्हाला छान वाटतंय, तुम्हाला मजा येतेय. मग तुम्ही जगून घ्या. लोक काय म्हणतील हा मुद्दाच तुमच्या आयुष्यात ठेवू नका. कारण, लोक बोलत राहणार, त्यांचा तुमच्याशी काहीच संबंध नाही. त्यांच्या मताकडे लक्ष देऊन तुम्ही काय करणार? जी काही १०-१५ वर्षे तुमच्या आयुष्यातली राहिलीत, ती छान जगून घ्या. तुम्हाला जे वाटेल करा.’
Maharashtra TimesChinmayee Sumeet : ‘पक्षाप्रमाणेच निरर्थक गोष्टी करतायत, बेरोजगारी वाढवायची, मुलांचा आत्मसन्मान दुखवायचा’, कंगना रणौतवर चिन्मयी सुमीतचा संताप
‘प्रत्येकालाच हा अनुभव असेल, आता कॉलेज झालं, लग्न झालं, बाळ झालं, मग दिवसांनी तुम्हाला वाटेल अरे माझा मुलगाही मोठा झाला. एखादा सिनेमा पाहावा तशी ही वर्ष निघून जातात. मग कुणासाठी का थांबायचंय, मला वाटतं की तुम्ही एन्जॉय करा. तेच तुमच्या हातात आहे आणि ते आयुष्य तुमच्यासाठी वापरा. हा विचार केला ना की, कोण तुम्हाला थांबवणार नाही.’ असं ऐश्वर्या यांनी शेवटी सांगितलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या नारकर बोलत होत्या.
Maharashtra TimesKritika Tulaskar : ‘कलाकार म्हणून स्विच ऑन स्विच ऑफ होणं गरजेचं’, कृतिका तुळसकरनं ओढले ताशेरे, म्हणाली, ‘माझ्याबद्दल बोलण्याचा हक्क नाही’
दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं तर लवकरच त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ही मालिका १० ऑगस्टपासून संध्याकाळी ६:३० वाजता प्रसारित करण्यात येईल.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा