Headlines

Nanded Himayatnagar Zilla Parishad Teacher Death Case Postmortem Report Killed of Children then Ended his Own Life; जि.प. शिक्षक मृत्यू प्रकरण; पोटच्या दोन लेकरांसह स्वत: आयुष्य संपवलं, गोदावरी नदीत कार टाकली, PM रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड


Nanded Zilla Parishad Teacher Suicide Case : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Nanded Zilla Parishad Teacher Suicide Case
हिमायतनगर जिल्हा परिषद शिक्षक आत्महत्या प्रकरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने आपल्या दोन मुलांसह कार नदीत टाकून आत्महत्या केली होती. शुक्रवारी सकाळी मुदखेड तालुक्यातील पुनेगाव नदी पुलावर ही घटना घडली. या घटनेत आता मोठी आणि मनाला चटका लावणारी माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी शिक्षक पित्याने आपल्या दोन्ही चिमुकल्या मुलांच्या पोटात आणि छातीत चाकू भोसकून खुन केला. त्यानंतर मृतदेह गाडीत ठेवून स्वतः गाडी भरधाव वेगाने चालवत 50 फूट खोल गोदावरी नदीत टाकली. निर्दयी बापानेच निष्पाप मुलांची हत्या केल्याची बाब उघडकीस आल्यानं संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी मयत वडिलांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

सुनील मोरे आणि त्यांची पत्नी धम्मशिला हे दोघे दाम्पत्य हिमायतनगर तालुक्यातील पोटा जिल्हा परिषद शाळेत शिक्षकपदी कार्यरत होते. त्यांना दोन अपत्ये होती. गुरुवारी सायंकाळी सुनील मोरे हे, ‘आपल्या दोन्ही मुलांना खासगी क्लासेसमध्ये सोडतो’, असं सांगून कारमध्ये घेऊन घरातून निघाले. पण क्लासेसला न सोडता अज्ञातस्थळी मुलांना ते घेऊन गेले. इकडे मुलं घरी परत न आल्यानं शिक्षिका पत्नीने पती सुनील मोरे यांना फोन करून विचारणा केली. ‘माझ्यासोबत मुलं नाही’, असं सुनील मोरे यांनी सांगितलं.
Maharashtra TimesDive Ghat Twin Tunnels: दुहेरी बोगद्यातून रस्ते आणि मेट्रो, पुरंदर विमानतळासाठी नव्या प्रकल्पाचा विचार; कुठे-कसा असेल?
शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनेगाव येथील पुलावरून मयतानं मुलांसह भरधाव कार थेट 50 फूट खोल गोदावरी नदीपात्रात टाकली. सुरुवातीला हा केवळ अपघाती आत्महत्येचा प्रकार वाटत होता, परंतु पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी सुनील मोरे यांनी आपल्या मुलांच्या छातीत आणि पोटात चाकूने वार करून निर्घृणपणे त्यांचा खून केला. रात्री मुलं झोपेत असताना आरोपी पित्याने खून केला असावा किंवा गाडीतच हत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

आपल्याकडे अधिकाऱ्यांविरोधात पुरावे

दुसरीकडे सुनील मोरे यांनी घटनेपूर्वी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले. ‘मी माझ्या मुलांना संपवून आत्महत्या करत आहे’. स्टेटसमध्ये हदगावचे गटशिक्षण अधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्चे, केंद्र प्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी दत्ता विश्वभर पवळे यांच्या नावाचा देखील उल्लेख केला होता. दरम्यान, मुलांसह पती गायब असल्यानं पत्नीने विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
Maharashtra TimesCrime News : पुणे-बंगळुरु महामार्गावर गोळीबाराचा थरार, विधानसभा निवडणूक लढलेल्या उमेदवाराकडून मित्रावर हल्ला
दरम्यान, मोरे यांनी आपल्या सहकार्याला फोन करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. आपल्याकडे अधिकाऱ्यांविरोधात पुरावे आहेत, असं त्यांनी संभाषणात म्हटलं होतं. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता बापाविरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण येण्याची शक्यता आहे. ग्रामीण पोलिसांनी शिक्षक पित्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा