Headlines

बेबी बॉस वैभव सूर्यवंशीचा तब्बल 102 मीटरचा जायंट षटकार, कॅप्टन सिकंदर पाहतच राहिला; Video व्हायरल


Vaibhav Sooryavanshi Sixer : वैभव सूर्यवंशीला उगाच नाही बेबी बॉस बोललं जात, तिसऱ्या टी-२० सामन्यात वैभवने तब्बल १०२ मीटरचा षटकार मारला. झिम्बाब्वेच्या कॅप्टनलाच त्याने हा गगनचुंबी षटकार मारला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vaibhav Sooryavanshi Six
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमधील रविवारी पार पडलेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने २० ओव्हरमध्ये १९२-५ धावा केल्या होत्या. यामध्ये वैभव सूर्यवंशी याने ८१ धावांची दमदार खेळी केली होती. पठ्ठ्या शतकाच्या दिशेनेच वाटचाल करत होता पण दुर्देवाने तो आऊट झाला. या खेळीमध्ये ८ चौकार आणि ४ षटकार मारले. यामधील एक तर १०२ मीटरचा गगनचुंबी षटकरा होता. तोही झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याला त्याने लगावला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जाणून घ्या.

१३ व्या ओव्हरमधील सिकंदर रझा याच्याो तिसऱ्या चेंडूवर पुढे येत त्याने चेंडू थेट स्टेडियमच्या वरच्या भागावर मारला, अवघ्या १५ वर्षांचा मुलगा आणि थेट १०० पेक्षा जास्त मीटरचा षटकार मारतो म्हणजे चेष्टा नाही. वैभवने जर शतक केले असते वर्ल्ड रेकॉर्ड ठरला असता. पण ते होऊ शकले नाही.
Maharashtra TimesIND vs SL Test : श्रीलंकेविरुद्ध कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा कधी होणार, दुखापतींचे ग्रहण पण वेळ ठरली, जाणून घ्या

तिसऱ्या टी-२० सामन्याचा सविस्तर आढावा

अभिषेक शर्मा अवघ्या दोन धावांवर बाद झाल्याचा परिणाम सलामीवीर वैभवने आपल्या फलंदाजीवर होऊ दिला नाही. सावध सुरुवात करताना भारताने पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांत १ बाद ६४ धावा केल्या होत्या. वैभवने ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वैभवने ईशान किशनसह ५० चेंडूंत ७५, तर अय्यरसह २९ चेंडूंत ५० धावा केल्या. वैभव शतक ठोकणार असे वाटत असतानाच बाद झाला. त्याने ४९ चेंडूंत ७८ चौकार व चार षटकारांसह ८१ धावा केल्या.

Maharashtra TimesINDvsZIM : झिम्बाब्वेविरूद्ध फेल ठरल्याने अभिषेक खचला, पोस्ट करत व्यक्त झाला; सूर्या दादा धावून आला, म्हणाला…
मयंक यादवने पहिल्याच चेंडूवर ब्रायन बेनेटला बाद केले. यानंतर बेन करन आणि डिऑन मायर्सला फटकेबाजी करता आली नाही. सिकंद्र रझाला शून्यावर यश ठाकूरने माघारी पाठवले. रायन बुरीने अखेरपर्यंत मैदानात राहून विजयासाठी प्रयत्न केले खरे; पण त्याला इतरांची अपेक्षित साथ मिळाली नाही. त्याने वेसली मधेवेरेसह ५० चेंडूंत ६० धावा जोडल्या. ही भागीदारी वगळता मोठ्या भागीदारी होऊ शकल्या नाहीत; त्याचबरोबर इतरांना भारतीय गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके मारता आले नाहीत. रायन बुरीने ४३ चेंडूंत पाच चौकारांसह नाबाद ५४ धावा केल्या.
Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi IND vs ZIM : वैभव तू एवढा कसा फोडतो रे? झिम्बाब्वेत पराक्रम, मालिकावीर पुरस्कार खिशात! सूर्यवंशीने आक्रमक खेळीमागचं कारण सांगून टाकलं
दरम्यान, श्रेयस अय्यर याने दोन मालिका गमावल्यावर पहिलीच मालिका कर्णधार झाल्यापासून जिंकली. भारतानेही वर्ल्ड कप २०२६ नंतर जिंतलेली ही पहिलीच मालिका आहे. कर्णधार म्हणून पहिला विजयसुद्धा झिम्बाब्वेच्या मालिकेत आला आहे.