Headlines

बंगळुरूत महिन्याला 2 लाख पगार असून गरीब असल्यासारखे वाटते! युवकाने गणित मांडलं, आता तुम्हीच पाहा


Money Savings: दर महिन्याला दोन लाख रुपये पगार आणि डोक्यावर कोणतंही कर्ज नसतानाही 26 वर्षीय तरुणाला आपण ‘गरीब’ आहोत असे वाटते. बेंगळुरू येथील आयटी कंपनीत रुजू असलेल्या या तरुणाने खुद्द Reditt या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त केल्या. सोशल मीडिया पोस्टमध्ये हा तरुण म्हणतो की, “मी अत्यंत सामान्य कुटुंबातून आलो आहे. वयाच्या 21 व्या वर्षी पहिली नोकरी मिळाली, तोपर्यंत कुटुंबाचे उत्पन्न फक्त 6000 ते 7000 रुपये होते आणि संपूर्ण कुटुंब 10×100 फूटच्या एका लहान खोलीत राहत होते.”

नोकरीला लागल्यावर पैसे कमावल्यावर आपल्या पालकांना चांगली लाइफस्टाइल देण्याचे त्याचे प्राधान्य होते. आई-वडिलांनी काम करणे थांबवावे, असं त्याला वाटायचं. त्यात यशस्वी झाला आणि आज त्याचे आई-वडील मूळ गावी एका 2 बीएचके फ्लॅटमध्ये निवृत्तीचे जीवन जगत आहेत, तर स्वतः बेंगळुरूमध्ये एका 2 बीएचके फ्लॅटमध्ये राहतो. तरीही, आनंदी नाही.

Maharashtra TimesJoint Property Rights: भाऊ किंवा पार्टनरने तुमच्या नकळत घर, जमीन विकली तर काय कराल? प्रत्येक Co-Owner ला माहिती असावेत आपले अधिकार
आपल्या दर महिन्याच्या खर्च आणि गुंतवणुकीची माहिती देताना त्या तरुणाने सांगितले की, मी आपल्या उत्पन्नाचा मोठा भाव गुंतवतो दर महिन्याला म्युच्युअल फंडात 30000 रुपये, मुदत ठेवींमध्ये आणि सोन्याच्या चिट्समध्ये 10000 गुंतवतो. याव्यतिरिक्त आपल्या आई-वडिलांना 15000 रुपये ते 20000 रुपये पाठवतो व स्वतःचे घर भाडे व इतर खर्च मिळून अंदाजे 25000 रुपये खर्च करतो.

Maharashtra TimesBillionaire Divorce: आयुष्यभर कमावलं, घटस्फोटात गमावलं! दक्षिण कोरियात अब्जाधीशाचा घटस्फोट, पत्नीला देणार 944 अब्ज वोनची पोटगी
कुठं-कुठं गुंतवलाय पैसा

या तरुणाच्या पोर्टफोलिओत 4 लाखांचे शेअर्स, 2 लाख रुपयांची एफडी, 2 ते 2.5 लाखांचे सोने आणि सॅलरी खात्यात 6 लाख रुपये आहेत. तसेच आपल्या कुटुंबाच्या सुविधेसाठी 60,000 रुपयाची स्कुटर, 70,000 रुपयांचा मॅकबुक आणि 25 हजाराचा फोनही घेतला आहे. यासोबत पालकांसाठी 30000 रुपये स्वतःसाठी 24000 रुपयांचा विमादेखील काढला आहे.

Viral Reddit Post

भविष्याची चिंता सतावतेय

असं असूनही या तरुणाला आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे. यावर्षी लग्नावर किमान 10 लाख रुपये खर्च, 30 ते 40 लाख रुपयांची गाडी, 1 कोटी ते दीड कोटी रुपयांचा भूखंड खरेदी करायचा आहे आणि 20 लाखांची बाईक घेण्याचाही विचार असल्याचे तरुणाने म्हटले. त्याने म्हटले की त्याच्याकडे बचत आहे, पण एकाच वेळी सगळं परवडत नाही, त्यामुळे प्रत्येक निर्णयावर तडजोड करावी लागत आहे.

Maharashtra TimesUS Economic Crisis: ट्रम्पची अमेरिका अनागोंदींच्या वाटेनं! GDP वर 3250 लाख कोटींचे कर्ज, भारतासह सर्व गुंतवणूकदारांना कियोसाकींनी सांगितला उपाय
मित्रांना वाटतं तेव्हा वाटतं की…

पोस्टमध्ये तरुणाने पुढे म्हटले की, मी गावो जातो आणि मजूर म्हणून किंवा ऑटो-रिक्षा चालवणाऱ्या आपल्या मित्रांना पाहतो, तेव्हा माझी ही भावना अधिकच तीव्र होते. “ते कमी पैशात आनंदी आणि समाधानी दिसतात, पण केवळ अतिरिक्त 1000 रुपये मिळाल्यावर स्वतःला श्रीमंत समजतात.” अनेक मित्रांनी आपल्या आवडत्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज काढायला मागेपुढे पाहिले नाही, तर त्याने मात्र नेहमीच कर्ज टाळले.

या ‘गरिबी मानसिकतेचा’ दैनंदिन निर्णयांवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत, तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सगळं करूनही 750 रुपयेपेक्षा जास्त किमतीचा शर्ट खरेदी करतानाही आपल्याला दडपण येतं. बेंगळुरूमध्ये मित्रांसोबत बाहेर जाऊन, पार्ट्या करून आणि सहलीला जाऊनही, त्याला समाधानही वाटत नाही आणि श्रीमंतही वाटत नाही.

महिन्यांपासून या दुःखाशी झगडत असलेल्या त्या तरुणाने रेडिट समुदायाकडे सल्ला मागितला, तेव्हा लोकांनी त्याला जुन्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला.