Mamachya Govyala Jauya Trailer:‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. या सिनेमात कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी या चौघांची धम्माल पाहायला मिळणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: दिग्दर्शक विजू माने यांच्या ‘ मामाच्या गोव्याला जाऊया ’ या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गोव्याच्या ट्रिपला निघालेल्या संत्या, बाबा, कुश्या आणि त्यांच्या लाडक्या मामाची धमाल आणि अतरंगी ट्विस्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ च्या ट्रेलरनं या धमाल प्रवासाला सस्पेन्स, अॅक्शन आणि अनपेक्षित ट्विस्ट्सची भन्नाट जोड दिली आहे. ट्रेलरच्या अखेरीस दिसणारा मामाचा धक्कादायक डॉन अवतार हा नेमका खरा आहे की, त्यामागे आणखी काही रहस्य दडलंय, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण करत ट्रेलर चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढवतो.
यानंतर सुरू होतो पाठलाग, अॅक्शन, जबरदस्त कॉमिक टायमिंग आणि एकामागून एक धक्कादायक ट्विस्ट्सचा खेळ. मामा नेमका कोण आहे? तो खरंच डॉन आहे की या सगळ्यामागे आणखी काही मोठं रहस्य दडलं आहे? या प्रश्नांची उत्तरं मात्र चित्रपटगृहातच मिळणार आहेत. गोव्याच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर मैत्री, विनोद, थरार आणि अॅक्शनचा भन्नाट संगम ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. Jana Nayagan collection: तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा बॉक्स ऑफिसवर ‘विजय’, ‘जन नायकन’ नं पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई कुशल बद्रिके , अभिजित चव्हाण , संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी यांची अफलातून केमिस्ट्री हा ट्रेलरचा मोठा प्लस पॉइंट ठरते. त्यांच्यातील संवाद, टायमिंग आणि धमाल प्रसंग प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्याचबरोबर महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे, अवधूत गुप्ते आणि प्रवीण तरडे यांच्या दमदार भूमिका चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढवतात. नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले यांचा ग्लॅमरस अंदाजही ट्रेलरमध्ये वेगळी रंगत आणतो.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा