Headlines

Prashant Damle Appeals For Peace In Delhi Student Protest


मुंबई1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोज जनता पार्टीच्या वतीने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि वाढत्या तणावावर ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी आपली भूमिका मांडत सर्व संबंधितांना शांततेचे आणि संवादाचे कळकळीचे आवाहन केले आहे. “मला भांडणे किंवा मारामारी अजिबात आवडत नाही. मात्र, आजूबाजूची परिस्थिती पाहता आता व्यक्त होणे गरजेचे झाले आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य जपण्यासाठी हे भांडण तात्काळ थांबवून चर्चेच्या माध्यमातून विषय संपवण्याची नम्र विनंती केली आहे.

प्रशांत दामले म्हणाले, तुम्ही जशी आजुबाजुची परिस्थिती बघताय, तशी मीही बघतोय. अनेक जण म्हणाले की, व्यक्त व्हायले पाहिजे. खरं म्हणजे मला भांडायला आवडत नाही. मला मारामारी करायला आवडत नाही. पण आता परिस्थितीच तशी आहे की, व्यक्त होणे गरजेचे आहे.

भांडणे तात्पुरती, नाते कायम

प्रशांत दामले म्हणाले, “माझी सगळ्यांना विनंती आहे की, पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याचे नुकसान होता कामा नये. दुसरी महत्त्वाची गोष्टी म्हणजे कुणाच्या जीवाची हानी होता कामा नये. तिसरी गोष्ट अशी की, भांडणे ही तात्पुरती असतात. उद्या आपल्याला परत एकमेकांना भेटायचे आहे. एकमेकांसोबत गप्पा मारायच्या आहेत. दिवाळी, गणपती साजरे करायचे आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र करायच्या आहेत.”

सरकारने हात पुढे केलाय, तुम्हीही हात द्या

आंदोलनकर्त्यांना आणि सरकारला संवादाचा मार्ग निवडण्याचा सल्ला देताना प्रशांत दामले म्हणाले, माझी विनंती आहे की, “आता ही भांडणे थांबवा. सरकारने हात पुढे केलेला आहे. तुम्हीही तुमचा हात त्यांच्या हातात द्या आणि विषय संपवा. विद्यार्थी महत्त्वाचे आहेत, त्यांचे भवितव्य महत्त्वाचे आहे. भविष्यात आपला देश त्यांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांना वाचवणे, त्यांना शिकवणे फार महत्त्वाचे आहे.”

“सर्वांना नम्र विनंती आहे की, ही भांडणे आता थांबवा, लवकरात लवकर हा विषय संपवून टाका आणि चर्चा करा. संवादाने अनेक गोष्टी मोकळ्या होतात, सुटतात. लवकरात लवकर ही भांडणे संपवा एवढीच सगळ्यांना नम्र विनंती,” असेही प्रशांत दामले म्हणाले.

हे ही वाचा…

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्याशिवाय शांत बसणार नाही:सरकार जेव्हा घाबरते तेव्हा हिंदू-मुस्लीम करते – आदित्य ठाकरे

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट)चे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग न देता त्यांच्या हक्काच्या लढ्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. सविस्तर वाचा…

राज ठाकरेंचा संतप्त सवाल:विद्यार्थ्याला मारल्यावर शिक्षकांवर कारवाई होते; मग लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर, आदेश देणाऱ्यांवर कारवाई का नाही?

नीट परीक्षेतील गोंधळ आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर, सरकारवर आणि न्यायव्यवस्थेवरही सडकून टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत