Headlines

चराठा येथील सवित्री परब यांचे निधन


ओटवणे प्रतिनिधी : चराठा सातेरी मंदिर नजीक येथील रहिवाशी सवित्री बाबू परब (९२) यांचे गुरुवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. रात्री १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे, नातसुन, नातजावई, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
चराठा येथील सातेरी देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा सावंतवाडी येथील रेशन दुकान चालक राघो परब, सावंतवाडी येथील वि. स. खांडेकर माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी रवींद्र परब तसेच मुंबईत नेव्ही विभागात वाहन चालक असलेले गुरुनाथ परब यांच्या त्या मातोश्री, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा दक्षता समिती सदस्या सौ लक्ष्मी परब यांच्या त्या सासू तर चंद्रशेखर उर्फ शेखर परब यांच्या त्या आजी तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांच्या त्या आते आजी होत्या.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत