Headlines

8th Pay Commission Report Submission Deadline; 8th Pay Commission लागू व्हायला 2027 पर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार; केव्हा वाढीव पगार मिळणार? सरकारने संसदेत दिली माहिती


8th Pay Commission Report Deadline: नोव्हेंबर 2025 मध्ये स्थापन झालेल्या आठव्या वेतन आयोगाला केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनसह, DA वाढीबाबत अहवाल सादर करण्यासाठी 18 महिने दिले गेले आहेत. म्हणजे आठवा वेतन आयोग मे 2027 मध्ये आपला अहवाल सादर केर अपेक्षित असून सरकारने या डेडलाईनआधी लवकर अहवाल सादर करण्याबाबत स्थिती स्पष्ट केली.

8th Pay Commission Report Submission Deadline
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
8th CPC News: केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी 8 व्या वेतन आयोगाच्या अहवालासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 3 नोव्हेंबर 2025 रोजी स्थापना झाल्यापासून आठव्या वेतन आयोगाला शिफारसी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी दिला गेला आहे, त्यामुळे मे 2027 अंतिम मुदत संपते. त्यामुळे, आयोगाने अहवाल लवकर सादर करण्याबाबत कोणतीही निश्चिती केलेली नाही, असे सरकारने स्पष्ट केले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील चर्चा सत्रात आयोगाला स्थापनेपासून आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी दिल्याचे सरकारने स्पष्ट केले. पण, मे 2027 च्या डेडलाईन आधी आयोग शिफारशींचा अहवाल सादर करणार की नाही याबाबत अद्याप सरकारने कोणतेही विधान केलेले नाही.

Maharashtra TimesN Chandrasekaran Successor: टाटा समूहात नव्या ‘चंद्रा’चा शोध, उत्तराधिकारीबाबत चिंता; टाटा सन्सच्या नवीन बॉसच्या शर्यतीत कोण-कोण?न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील नव्या वेतन आयोगाचा सविस्तर तपशील आणि अर्थ राज्यमंत्र्यांनी संसदेत दिलेला प्रतिसाद खालीलप्रमाणे आहे. म्हणजे 8 वा वेतन आयोग आपल्या शिफारशी वेळेच्या आधी पूर्ण करेल याची सध्या कोणतीही अधिकृत पुष्टी सरकारने केलेली नाही. पण, मूळ सरकारी ठरावानुसार ज्या बाबींवर शिफारसी पूर्वीच अंतिम केल्या गेल्या आहेत, त्या बाबींवर आयोग अंतरिम अहवाल सादर करू शकतो.

आठव्या वेतन आयोगाचा अहवाल कधी येणार?

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमधील खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी परिस्थिती स्पष्ट केली. 8व्या वेतन आयोगाची स्थापना 3 नोव्हेंबर 2025 रोजी एका शासकीय ठरावाद्वारे केली गेली. आयोगाला आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत दिली आहे, परिणामी, मे 2027 अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत आहे.

Maharashtra Times99 Rupees Pension Scheme Explained: फक्त 99 रुपये जमा करुन मिळेल पेन्शन; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कसं करायचं अप्लाय, सविस्तर पाहा
अशा स्थितीत, वेतन आयोग मे 2027 पूर्वी सरकार आपला अहवाल सादर करेल का, असे विचारले असता मंत्र्यांनी कोणतीही विशिष्ट तारीख निश्चित केली नाही आणि केवळ 18 महिन्यांच्या नियमाचा पुनरुच्चार केला. मात्र, मूळ प्रस्तावानुसार आयोगाने अंतिम मुदतीपूर्वी एखाद्या विशिष्ट विषयावरील शिफारशींना अंतिम स्वरूप दिल्यास सरकारला अंतरिम अहवाल सादर करू शकतो.

8 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख

अशा परिस्थितीत, सध्या केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्स नव्या नवीन शिफारशी कधी लागू होतील, याचीच वाट पाहत आहेत. जोपर्यंत आयोग आपला अंतिम किंवा अंतरिम अहवाल सादर करत नाही आणि सरकार त्यावर विचार करत नाही, तोपर्यंत नवीन दरांच्या अंमलबजावणीच्या तारखेबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही, असे सरकारने स्पष्ट सांगितले.

Maharashtra TimesMega Deal: मुकेश अंबानींनी अमेरिकेसोबत केली मोठी डील; 18,268 कोटींची गुंतवणूक भारतात येणार, BofA शी हातमिळवणीअशाप्रकारे, एकूणच केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना नवीन पगार, थकबाकी आणि निवृत्तीवेतन सुधारणेसाठी आयोगाच्या बैठका पूर्ण होण्याची आणि मे 2027 पर्यंत अहवालाची वाट पाहावी लागेल.

वेतन आयोग सध्या सल्लामसलत करत असून कर्मचारी संघटना, कामगार संघटना, पेन्शनर्स संघटना आणि इतर संबंधित घटकांशी चर्चा करत आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीतील बैठकीनंतर जयपूर, चेन्नई, पुद्दुचेरी आणि चंदीगड येथील संबंधित घटकांशी आगामी चर्चा केली जाईल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा