केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये थकबाकीची उत्सुकता
देशभरातील 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 67 लाख निवृत्ती वेतनधारकांमध्ये 8 व्या वेतन आयोगाबद्दल तीव्र चर्चा झाली आहे. आयोगाच्या शिफारशींबद्दल दिवसेंदिवस चर्चा जोर धरत असताना कर्मचारी पगारवाढ आणि थकबाकीबद्दलही अधिकाधिक चिंतेत आहेत. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर बँक खात्यात किती थकबाकी जमा होईल?
Raghuram Rajan: माणसं काढून AI वापरणाऱ्या कंपन्यांवर कर लादा, कृत्रिम बुद्धीमत्तेचा जेवढा वापर तेवढा कर! अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांचा प्रस्तावनवीन पगारवाढ लागू होताच तुम्हाला मूळ पगारासोबतच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, LTC आणि बाल शिक्षण भत्ता यांची मासिक थकबाकी मिळेल असं तुम्ही गृहीत धरलं असेल तर, केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का बसू शकतो. वेतन आयोगाच्या नियमांनुसार, प्रत्येक घटकासाठी थकबाकी दिली जात नाही. चला, नवीन पगारातील थकबाकीमागील गणित आणि तुम्हाला कोणते भत्ते मिळणार नाहीत समजून घेऊया.
आठव्या वेतन आयोगातून काय-काय बदलणार
वेतन आयोग केवळ मूळ पगारात वाढ करत नई तर, सरकारी यंत्रणेच्या संपूर्ण वेतनश्रेणी आणि कल्याणकारी भत्त्यांमध्येही सुधारणा करते.
LIC Plan: दररोज फक्त 95 रुपयांची बचत करून वयाच्या शंभरीपर्यंत दरवर्षी मिळवा 80,000 रुपये; छोट्या गुंतवणुकीतून मिळेल लाइफटाइम इन्कमपेन्शनर्ससाठी महागाई सवलत: विद्यमान कर्मचाऱ्यांच्या पगारासोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मूळ निवृत्तीवेतनही सुधारित केले जाईल आणि नवीन वेतन मॅट्रिक्सनुसार नवीन महागाई सवलत रचना तयार केली जाईल.
ग्रॅच्युइटी आणि लीव एनकॅशमेंट: सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या कमाल ग्रॅच्युइटीची मर्यादा आणि रजा रोखीकरणाच्या नियमांमध्ये सुधारणा अपेक्षित आहे.
वेतन मॅट्रिक्स आणि फिटमेंट फॅक्टर: वेतन मॅट्रिक्सच्या विविध स्तरांसाठी (लेव्हल 1 ते लेव्हल 18) नवीन फिटमेंट फॅक्टर स्थापित केले जातील, ज्यामुळे किमान पगारात लक्षणीय वाढ होईल.
वैद्यकीय अन् रिस्क भत्ता: देशातील दुर्गम भागात तैनात सैनिकांसाठी CGHS सुविधा, वैद्यकीय किंवा रुग्णालयीन भत्ता आणि जोखीम व रिस्क भत्त्यामध्येही बदल केले जातील.
थकबाकी अन् भत्ते: सोप्या शब्दात समजून घ्या
| घटक | निवृत्तीवेतनाची थकबाकी | नियम आणि कारण |
| बेसिक सैलरी (Basic Pay) | होय (100%) | 1 जानेवारी 2026 पासून वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या तारखेपर्यंत फरकाची संपूर्ण थकबाकी मिळेल |
| महागाई भत्ता | नाही | महागाई भत्ता जुन्या मूळ वेतनात मर्ज केला जातो, दुप्पट थकबाकी दिली जात नाही. |
| घरभाडे भत्ता | नाही | नवीन दर केवळ अधिसूचनेच्या तारखेपासून लागू होतील. |
| CEA आणि LTC | नाही | हा भत्ता कर्मचाऱ्यांच्या दाव्यावर आधारित आहेत, नवीन दर अधिसूचनेच्या तारखेपासून लागू होतील. |
| निवृत्तीवेतनाची थकबाकी | होय | मूळ निवृत्ती वेतनातील वाढीची थकबाकी निवृत्तीवेतनधारकांना दिली जाईल. |
लक्षात घ्या की नव्या वेतन आयोगातून कर्मचाऱ्यांच्या Take-Home Salary आणि EPF मध्येही निश्चितच मोठी वाढ होईल, पण थकबाकीचे कॅलक्युलेशन समजून घेताना केवळ Basic Pay मधील फरक विचारात घेणे फायद्याचे ठरेल.

