500 Note and National Flag: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीनं अनोखा प्रयोग केला. ५०० रुपयांची नोट आणि तिरंगा यापैकी एक गोष्ट निवडा, असं लोकांना सांगितलं. या प्रयोगावर लोकांनी असा काही प्रतिसाद दिला आहे, जो पाहून तुम्ही देखील दंग व्हाल. चला, पाहूया व्हायरल झालेला हा व्हिडीओ.

कोणी कोणी निवडला राष्ट्रध्वज
हा व्हिडीओ funny.one555 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एकीकडे ५०० रुपयांची नोट आणि दुसरीकडे तिरंगा ठेवून लोकांना दोन्हीपैकी एक पर्याय निवडायला सांगितलं जात आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील पोलीस जवान विनोद कुमार पांडे यांनी तिरंगा निवडला. तर दुसरीकडे एका शाळेतल्या मुलानं ५०० रुपयांची नोट निवडली. दरम्यान, काही लोक असेही होते ज्यांनी कुठलाच पर्याय निवडला नाही.
(फोटो सौजन्य – funny.one555/Instagram)
हा व्हिडीओ होतोय व्हायरल
हा व्हिडीओ ६१ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच, २ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतंय, “मीसुद्धा राष्ट्रध्वज घेतला असता.” तर कोणाच्या मते, दोन्ही गोष्टी घ्यायला पाहिजे होत्या. असो, तुम्ही यापैकी कुठली गोष्ट घेतली असती? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

