Headlines

500 Rupees vs National Flag Viral Independence Day Experiment Tests Peoples Patriotism | तिरंगा की ५०० रुपये! लोकांची देशभक्ती पाहण्यासाठी केला प्रयोग, पण रिझल्ट पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ


500 Note and National Flag: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीनं अनोखा प्रयोग केला. ५०० रुपयांची नोट आणि तिरंगा यापैकी एक गोष्ट निवडा, असं लोकांना सांगितलं. या प्रयोगावर लोकांनी असा काही प्रतिसाद दिला आहे, जो पाहून तुम्ही देखील दंग व्हाल. चला, पाहूया व्हायरल झालेला हा व्हिडीओ.

500 Rupees vs National Flag
(फोटो सौजन्य – funny.one555/Instagram)
आज १५ ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्यदिन! आजच्या दिवशी देशभरात उत्साहाचं आणि देशभक्तीचं वातावरण असतं. शाळा, महाविद्यालयं, सरकारी कार्यालयं आणि इतर अनेक ठिकाणी तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाला सलामी दिली जाते. याच पार्श्वभूमीवर एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक व्यक्ती लोकांसमोर ५०० रुपयांची नोट आणि राष्ट्रध्वज ठेवतोय आणि दोघांपैकी एक गोष्ट निवडायला सांगतोय. गंमत म्हणजे, हा प्रयोग त्यानं शाळेतल्या मुलांपासून ते पोलिसांपर्यंत सगळ्यांसोबत केला. चला तर मग, पाहूया या लोकांपैकी कोणी कुठली गोष्ट निवडली.

कोणी कोणी निवडला राष्ट्रध्वज

कोणी कोणी निवडला राष्ट्रध्वज

हा व्हिडीओ funny.one555 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एकीकडे ५०० रुपयांची नोट आणि दुसरीकडे तिरंगा ठेवून लोकांना दोन्हीपैकी एक पर्याय निवडायला सांगितलं जात आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील पोलीस जवान विनोद कुमार पांडे यांनी तिरंगा निवडला. तर दुसरीकडे एका शाळेतल्या मुलानं ५०० रुपयांची नोट निवडली. दरम्यान, काही लोक असेही होते ज्यांनी कुठलाच पर्याय निवडला नाही.
(फोटो सौजन्य – funny.one555/Instagram)

हा व्हिडीओ होतोय व्हायरल

​ ​

हा व्हिडीओ ६१ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच, २ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतंय, “मीसुद्धा राष्ट्रध्वज घेतला असता.” तर कोणाच्या मते, दोन्ही गोष्टी घ्यायला पाहिजे होत्या. असो, तुम्ही यापैकी कुठली गोष्ट घेतली असती? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा