ICC ODI World Cup 2027 : आयसीसीने २०२७ वनडे वल्डकपसाठी स्पर्धेत नवे आणि रोमांचक स्वरुप जाहीर केले आहे. ज्यामध्ये आता १४ संघ असणार आहेत. त्याशिवाय नव्या नियमांनुसार सुपर सीरिज आणि सुपर ७ फेऱ्याही खेळल्या जाणार आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदे होणाऱ्या पुरुष वनडे वर्ल्ड कपच्या फॉरमॅटमध्ये अत्यंत धक्कादायक बदल केला आहे. एडिनबर्ग येथे पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या नव्या नियमांची अधिकृत घोषणा करण्यात आली. टूर्नामेंटच्या सुरुवातीपासूनच सामन्यांमधील थरार आणि चुरस वाढवणे, हा या बदलामागील मुख्य उद्देश आहे. या नव्या नियमांमुळे आता कोणत्याही बलाढ्य संघाला स्पर्धेची सुरुवात हलक्यात घेता येणार नाही.
सर्वात खाली असलेल्या ३ टीम्समध्ये काटे की टक्कर
या मेगा इव्हेंटमध्ये एकूण १४ देश सहभागी होणार आहेत. मात्र, मुख्य ग्रुप स्टेज सुरू होण्यापूर्वीच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आयसीसी यावेळी ‘सुपर सीरीज’ हा नवा राऊंड घेऊन येत आहे. यामध्ये सर्वात खालच्या रँकिंगवर असलेल्या तीन संघांमध्ये सामने खेळवले जातील. राऊंड-रॉबिन फॉरमॅटनुसार हे तीन संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. विशेष म्हणजे, या तीनपैकी केवळ एकच संघ मुख्य ग्रुप स्टेजमध्ये जाईल, तर इतर दोन संघांचे वर्ल्ड कपचे स्वप्न इथेच धुळीस मिळेल आणि ते थेट स्पर्धेतून बाहेर पडतील.
६-६ संघांच्या दोन ग्रुपमध्ये रंगणार ३० सामने
सुपर सीरीज संपल्यानंतर स्पर्धेत एकूण १२ संघ शिल्लक राहतील. या १२ संघांना प्रत्येकी ६ अशा दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागले जाईल. या राऊंड २ मध्ये एकूण ३० सामने खेळवले जातील. प्रत्येक संघ आपल्या ग्रुपमधील इतर सर्व संघांसोबत एक-एक मॅच खेळेल. खरा संघर्ष याच टप्प्यात पाहायला मिळेल, कारण इथून पुढे जाण्यासाठी प्रत्येक संघाला आपली संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.
ग्रुप स्टेजच्या समाप्तीनंतर टूर्नामेंट ‘सुपर ७’ या नव्या आणि अत्यंत रंजक राऊंडमध्ये प्रवेश करेल. दोन्ही ग्रुपमधील टॉप ३-३ संघ (एकूण ६ संघ) थेट या राऊंडमध्ये पोहोचतील. पण, ७ व्या स्थानासाठी एक खास ट्विस्ट असेल. दोन्ही ग्रुपमध्ये मागे राहिलेल्या इतर संघांपैकी ज्या संघाची कामगिरी सर्वात उत्कृष्ट असेल, अशा एका सर्वोत्कृष्ट संघाला सातवे स्थान देऊन या राऊंडमध्ये एन्ट्री दिली जाईल. या सुपर ७ राऊंडमध्ये सर्व ७ संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील आणि येथे एकूण २१ हायव्होल्टेज लढती पाहायला मिळतील.
असा ठरणार सेमीफायनलचा मार्ग; सेमीफायनलचे थेट समीकरण
सुपर ७ राऊंडच्या समाप्तीनंतर तयार होणाऱ्या पॉइंट्स टेबलमधील टॉप ४ संघ थेट सेमीफायनलचे तिकीट बुक करतील. सेमीफायनलचे वेळापत्रकही अगदी सरळ आणि रोमांचक असणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा संघ चौथ्या क्रमांकाच्या संघाशी भिडेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे संघ दुसऱ्या सेमीफायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकतील. या संपूर्ण नव्या फॉरमॅटमुळे २०२७ चा वर्ल्ड कप आतापर्यंतचा सर्वात थरारक आणि अनपेक्षित वर्ल्ड कप ठरण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा