Nagpur Crime: नागपुरात महिलेच्या जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न; VIDEO व्हायरल करायची धमकी देऊन 3 लाख उकळले, वर्गमित्रासह दोघांना अटक
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: गुंगीचे औषध दिल्यानंतर अत्याचार करून वर्गमित्राने विवाहितेच्या धर्मांतरणाचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सोनेगाव पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या वर्गमित्रासह दोघांना अटक केली असून, अन्य एक फरार आहे. अय्याज ताज मदारे (वय २६, रा. ब्राह्मणी फाटा, कळमेश्वर) व आमीन शेख (वय ३०, रा. कळमेश्वर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत….
