Mehkar Drishyam Style Murder Case : पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद असल्याचे आणि चार वर्षांपूर्वी सुकळी गावातील एकाचा घातपात केल्याचा संशय पत्नीने पोलिसांसमोर व्यक्त केला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीची हत्या करून बॉडी एका हॉटेलमागे जमिनीत सिमेंट कॉंक्रिटमध्ये गाडण्यात आली. ज्या आरोपीने ही ‘दृश्यम’स्टाइल हत्या केली, त्याच्या पत्नीनेच त्याचे बिंग फोडले. मेहकर ते मोळा मार्गावर जामगाव शिवारात मंगळवारी पहाटे पोलिसांनी खड्डा उकरला असता त्यामध्ये मानवी सांगाडा आढळला. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे. ही हत्या का करण्यात आली, याची कसून चौकशी केली जात आहे.
आरोपी सचिनची मेहकरला राहणारी पत्नी १७ एप्रिल रोजी मेहकर पोलिसांत पतीविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेली होती. पती त्रास देत असल्याची तिची कैफियत होती. पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद असल्याचे व चार वर्षांपूर्वी सुकळी गावातील एकाचा घातपात केल्याचा संशय पोलिसांसमोर व्यक्त केला होता. पती त्रास देताना या गोष्टी बोलायचा. दरम्यान, पोलिसांनी कसून तपास सुरू केला. तसेच पुरावे जमा करायला सुरुवात केली. सचिन उगले व सुनील जाधव या दोघांवरही पाळत ठेवण्यात आली. यानंतर या गुन्ह्याची उकल झाली.
Eknath Shinde यांनी पहलगाम हल्ल्यातील शहीदासाठी बांधलं घर, कुटुंबियांनी मानले आभार
दारु पाजून हत्या, हॉटेलमागे खड्डा खोदून पुरलं
२ मे २०२२ रोजी दुपारी सुनील जाधव याच्या मदतीने विनोद नवले याचा मेहकर ते मोळा रोडवरील रहेमान उर्फ बाबा भिकू कुरेशी याच्या जामगाव शिवारातील शेतातील हॉटेल पैलवानमध्ये दारू पाजून हत्या केल्याची व हॉटेल मागे खड्डा खोदून पुरल्यानंतर त्यावर सिमेंटचा कोबा केल्याची कबुली आरोपी उगले याने पोलिसांना दिली. आरोपींना घेऊन खड्डा उकरण्यात आला असता मृताचा सांगाडा आढळून आला. चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या विनोदच्या हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. Crime News : मसाल्यातून विष, सासूचा मृत्यू; डॉक्टरांना कॉलेजमधले धडे आठवले, नववधूच्या नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं पोलिस आपल्याबद्दल व साथीदाराविषयी चौकशी करीत असल्याची कुणकुण लागल्याने आरोपी सावध झाला. मात्र, आता आपला गुन्हा जास्त दिवस लपवू शकणार नसल्याची भीती वाटल्याने सचिन उगले हा मंगळवारी मेहकर पोलिसांना शरण आला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा