विठूरायाच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला:आमदार नारायण कुचे यांच्या कारला भीषण अपघात; तिघे जण जखमी
जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या कारला आज पहाटे भीषण अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरवरून पंढरपूरकडे विठूरायाच्या दर्शनासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने, अपघाताच्या वेळी आमदार कुचे गाडीत नसल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. मात्र, या दुर्घटनेत गाडीतील तिघे जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमका अपघात कसा…
