Vasai-Virar News: प्रशासनाने लागू केलेली पाणीपट्टी वाढ अन्यायकारक असल्याचा आक्षेप घेत विरोधी पक्षातील भाजप नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजप सदस्यांनी सभात्याग केला.

जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले होते. वाहतूक विस्कळीत झाली होती, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर पूरस्थितीची कारणे, जबाबदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत महासभेत चर्चा होणे अपेक्षित होते.
Girish Mahajan: ठाकरेसेनेत तुम्ही तिघंच जण राहाल! गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना टोला
सामाजिक कार्यकर्त्यांनी अपूर्ण नालेसफाई, नैसर्गिक पाण्याचा निचरा होणारे मार्ग बंद होणे आणि अनधिकृत बांधकामांमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला आहे. तसेच पूर टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत करण्यात आल्या नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मात्र, महासभेच्या सुरुवातीलाच वाढीव पाणीपट्टीचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला.
विरोधक सभागृहातून बाहेर पडल्यानंतर पूरस्थितीवरील चर्चेला सुरुवात होण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाने सभा संपल्याचे जाहीर केल्याने हा विषय चर्चेविनाच राहिला. परिणामी, पूरस्थितीची कारणे, जबाबदारी आणि भविष्यातील उपाययोजनांवर कोणताही निर्णय किंवा चर्चा होऊ शकली नाही.
Accident News: आजीच्या अंत्ययात्रेला निघाला अन् नियतीने वाटेतच थांबवले; नातवालाही श्रद्धांजली वाहण्याची कुटुंबावर दुर्दैवी वेळ
नागरिकांमध्ये नाराजी
पुराचा फटका बसलेल्या नागरिकांच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा असताना महासभेत त्यावर चर्चा न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

