दीड-दमडी: आपल्या प्रेमाची शप्पथ! – deed damadi tambi durai special article on development work
-तंबी दुराईमध्यरात्र कधीच उलटून गेली होती. तो एकटाच एक रोमँटिक वेबसीरिज बघत जागा होता. घरातले सगळे झोपले आहेत याची खात्री झाल्यावर त्याने मोबाइल बाजूला ठेवला. खिडकीचा पडदा बाजूला सारून त्याने हळूच बाहेर पाहिलं. रस्त्यावर पूर्ण शुकशुकाट होता. आणि त्याला तो दिसला… साधारण तीन बाय दोनच्या आकाराचा, परंतु एखाद्या सुंदर अमिबासारखे त्याचे रूप होते. आकाशात कधी…
