Headlines

माझं आणि नीलम शिर्केचं भांडण होतं, वादळवाटच्या अवॉर्डनंतर काय घडलेलं? अदिती सारंगधरनं सांगितला कोल्ड वॉरचा किस्सा| Maharashtra Times


Aditi Sarangdhar Nilam Shirke Fight : अभिनेत्री अदिती सारंगधरने एका मुलाखतीत वादळवाट मालिकेदरम्यानच्या आठवणींना उजाळा दिल्या. त्या काळात तिच्यात आणि नीलम शिर्केमध्ये असलेल्या वादाबद्दलही तिने सांगितले.

aditi sarangdhar neelam shirke
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इंडस्ट्रीमधील कलाकारांची भांडणं हा सामान्य विषय आहे. आजपर्यंत अनेक कलाकार आपण एकमेकांपेक्षा कसे वरचढ आहोत हे दाखवण्यात शत्रूत्व घेऊन फिरतात. उघड उघड राग व्यक्त करतात. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा दोन मैत्रिणी आहेत ज्यांच्यामध्ये आधी स्पर्धा होती पण आता त्या एकमेकींच्या फार उत्तम मैत्रिणी झाल्या आहेत. त्या म्हणजे अदिती सारंगधर आणि निलम शिर्के. वादळवाट या गाजलेल्या मालिकेत त्यांनी एकत्र काम केले होते. त्या मालिकेदरम्यानची एक आठवण अदितीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेअर केली.

अदिती म्हणाली की माझी कोणाशी फार मैत्री नव्हती, माझी कोणाशी दुश्मनी ही नव्हती. मी फार कोणामध्ये पडायचेच नाही. मला असं वाटतं की मी फक्त काम करायचे आणि निघून जायचे. पुढे अदितीने सांगितले की माझं आणि नीलमचं म्हणजेच नीलम शिर्केचं भांडण होतं. वादळवाट ही मालिका करत असताना आमच्यात एक वेगळीच स्पर्धा होती. तेव्हा आमचं जरा एकमेकींसोबत कोल्ड वॉर सुरू होतं. पण आता आम्ही एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. आम्ही दोघीही आमच्या आयुष्यात खूप पुढे आलो आहोत. तेव्हा आम्ही साधारण वीस-पंचवीस वर्षांच्या होतो. आता आम्ही 45 वगैरेच्या आसपास आहोत. मला असं वाटतं की आपण हळूहळू शिकतो आणि मग आपल्यालाच हसायला येतं की काय यार आपण काय करत होतो! तिला अवॉर्ड मिळाला म्हणून मला राग आला, मला अवार्ड मिळाला म्हणून तिला राग आला हा काय वेडेपणा होता. मध्ये आम्ही भेटलो होतो तेव्हा हे सगळं आठवून हसत होतो. आता आपण आयुष्यात पुढे गेलो आहोत आणि प्रगती करत आहोत हे खूप चांगली गोष्ट आहे.

Maharashtra TimesSonu Nigam Beggar Video : ‘भिकारी’ बनून सोनू निगमने फुटपाथवर गायलेली गाणी, 12 रुपये मिळालेली भीक, त्या पैशांचं काय केलं माहित्येय?
याच मुलाखतीमध्ये अदिती सारंगधरने त्या वयात कामाप्रती जेलसी असणं हे सुद्धा चांगलं असतं हे पटवून देताना सांगितलं की आपण सगळ्या भावनांचा अनुभव घेतला पाहिजे. तुम्हाला अपयश पण मिळालं पाहिजे, यश पण मिळालं पाहिजे , लोकांनी तुम्हाला दुय्यम स्थान पण दिला पाहिजे आणि प्राथमिक पण स्थान दिलं पाहिजे. तुम्हाला एक प्रकारचा एक्सेप्टन्स असला पाहिजे. आताच्या काळात माझ्या वयाच्या काही मुली लीड रोल सुद्धा करत आहेत पण मी स्वतः लीड रोल करणं निवडत नाही कारण तेवढा वेळ मी त्यांना देऊ शकत नाही. मी आता सेकंडरी पोझिशन मध्ये असताना काही गोष्टी मला मिळत नाही त्याचं वाईट वाटतं पण ते वाईट वाटणं एक्सेप्ट करून पुढे जाणारी महत्त्वाचं म्हणजे आहे. आता आपण सगळीकडे जाऊ शकत नाही , ती धावपळ करणं आपल्याला झेपणार नाही त्यामुळे का उगीच मी रोल निवडायचा. म्हणूनच मी आता आई ताई असे रोल करते.

Maharashtra TimesAadesh Bandekar On Pooja Birari : सासरा कमी बाबाच जास्त झालोय, घरात लेक असल्याचा आनंद; सूनबाईंबद्दल भरभरून बोलले सासरेबुवा आदेश बांदेकर
आताच्या काळात बरेच कलाकार हिंदी मध्ये सुद्धा झळकत असताना आपण तिथे गेलो नाही याबाबत बोलताना अदितीने सांगितले की मी स्वतःला प्रमोट करायला खूप कमी पडले. आपण लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे कारण विदू विनोद चोप्रा यांना का माहिती असेल अदिती सारंगधर कोण? त्यांच्याकडे कास्टिंग वगैरे होते मग मी तिथे पोहोचला पाहिजे पण मी ते केलं नाही. मी कामासाठी अवेलेबल आहे मला ते काम करायचं आहे हे त्या कास्टिंग डायरेक्टर पर्यंत पोहोचला पाहिजे होतं जे मी केलं नाही पण आता मी ते हळूहळू करायला सुरुवात केली आहे. लोकमत फिल्मी ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अदितीने या भावना व्यक्त केल्या.

अदिती सारंगधर च्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती सध्या सनई चौघडे या झी मराठीवरील मालिकेत निगेटिव्ह रोलमध्ये पाहायला मिळत आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा