Headlines

20-year-old youth kills 39-year-old man in Washim over personal dispute; खळबळजनक! वादाने रौद्ररुप धारण केलं, 20 वर्षीय तरुणानं 40 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घातला, जागेवर…


वैयक्तिक वादातून ३९ वर्षीय व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या; 20 वर्षीय आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Man hit with stone over old rivalry in washim
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पंकज गाडेकर, वाशिम: राज्यामध्ये रोज गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. खळबळजनक घडामोडींनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे पुन्हा एकदा समोर येते आहे. दरम्यान, आता वाशिम शहरातील पंचशील नगर परिसरातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका २० वर्षीय तरुणाने ३९ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, वाशिम शहर पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृत राजू तुळशीराम कांबळे वय 39 वर्षे आणि आरोपी यश तोमर (ठाकूर) वय 20 वर्षे यांच्यात काही कारणावरून आपसी वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या यश ठाकूरने तुळशीराम यांच्या डोक्यात मोठा दगड घातला. या गंभीर हल्ल्यात तुळशीराम कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. काही तासांतच आरोपी यश ठाकूर याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Maharashtra TimesRohit Pawar On Ajit Pawar: ‘सुमित कपूरला विमान उडवता येत नव्हतं, सत्तेतल्या मोठ्या नेत्यानं त्याची तक्रारही केली होती’; रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा…

या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येमागील नेमके कारण काय होते आणि हा वाद नेमका कशामुळे झाला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृतक राजूची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची

या घटनेत मृत्यू झालेल्या राजू कांबळेची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याचे सांगितले जात आहे. राजू दारू पिऊन महिलांकडे वाईट नजरेने पाहत होता. तर अनेक वाटणारी आणि चोरीच्या गुन्ह्यातसुद्धा त्याचा सहभाग होता. एक प्रकारे तो सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले जात आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा अशा प्रकारे अंत झाला आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा