Headlines

सोशल मीडियावरील व्हायरल ‘बॉटेल नेक’ पूल अखेर खुला, गुपचूप उरकलं उद्घाटन; पुलासाठी ६ महिने प्रतीक्षा का?| Maharashtra Times


Bottleneck Flyover: मिरा भाईंदरमधील बहुचर्चित बॉटलनेक उड्डाणपूल गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय बनला होता. पुलाच्या रचनेपासून ते उद्घाटनाला झालेल्या विलंबापर्यंत अनेक कारणांमुळे चर्चा सुरू होत्या.

मिराभाईंदर बॉटलनेक पूल
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: अनोख्या रचनेमुळे देशभरात चर्चेत आलेला मिरा-भाईंदरमधील ‘बॉटल नेक’ पूल अखेर रविवारी गुपचूप नागरिकांच्या सेवेत दाखल झाला. पुलाचे बांधकाम पूर्ण होऊनही उद्घाटनाअभावी तो अनेक महिने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने मनसेने पूल ४८ तासांत खुला करण्याचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच रविवारी भाजपच्या वतीने पुलाचे उद्घाटन करण्यात आले.

पुलाच्या रचनेत आवश्यक सुधारणा

मिरा-भाईंदर शहरात प्रवेशासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोल्डन नेस्ट हा मुख्य मार्ग असून, त्याला अनेक पर्यायी रस्ते जोडलेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील चौकांमध्ये सातत्याने वाहतूककोंडी होत होती. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नागपूरच्या धर्तीवर मेट्रोला समांतर तीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. या योजने अंतर्गत तीन पूल उभारण्यात आले असून, त्यापैकी दोन पूल वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत. गोल्डन नेस्ट येथील पुलाचे काम सुमारे सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र, पुलावरील चार पदरी मार्ग पुढे दोन पदरी होत असल्याने त्याचे छायाचित्र ‘बॉटल नेक’ पूल या नावाने समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर पुलाच्या सुरक्षेबाबत आणि एमएमआरडीएच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानुसार सुरक्षेच्या दृष्टीने पुलाच्या रचनेत आवश्यक सुधारणा करण्यात आल्या.

Maharashtra TimesPune News: पुणेकरांसाठी महत्त्वाचे! भिडे पूलावर वाहतूक झाली बंद; पुन्हा कधी सुरू होणार? पर्यायी मार्ग कोणते?

सुधारणांची कामे पूर्ण होऊनही सुमारे दोन महिन्यांहून अधिक काळ हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी शुक्रवारी ४८ तासांत पूल खुला न झाल्यास तो नागरिकांसाठी स्वतःहून खुला करण्याचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच कोणताही गाजावाजा न करता रविवारी सकाळी भाजपचे

आता काशिमिरा जोडपुल्याची प्रतीक्षा

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशिमिरा पुलावरून डाव्या बाजूने थेट मिरा-भाईंदरमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी विद्यमान पुलाला नवीन जोडपूल उभारण्याचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. हा पूल झाल्यानंतर सुरू महामार्गावरून थेट भाईंदर फाटकापर्यंत सुमारे साडेचार किलोमीटरचा प्रवास वाहतूककोंडीविना करता येणार आहे. त्यामुळे या पुलाच्या कामाकडे आता मिरा-भाईंदरकरांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra TimesPune News: पुणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार, रेल्वेखाली भुयारी मार्ग आणि वर उड्डाणपूल बांधणार; शहराला मोठा फायदा

स्थानिक आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता आणि अन्य नगरसेवकांच्या उपस्थितीत पुलाचे उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. विकासकामांच्या उद्घाटनावेळी नेहमीप्रमाणे मोठा गाजावाजा, फलकबाजी किंवा निमंत्रणपत्रिकांचे वाटप यावेळी करण्यात आले नाही.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा