FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांची राजस्थानला बदली झाल्याविषयीच्या मेसेजने सोशल मिडियावर खळबळ उडवली. तर दुसरीकडे एका मिठाईच्या दुकानाचा परवाना निलंबित केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने FDA ला दणका दिला. या सगळ्याविषयी आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रोखठोक उत्तरे दिली आहेत. यासोबतच सुटे खाद्यतेल विक्रीवर बंदी घालण्यात आल्याचा निर्णय देखील त्यांनी सांगितला.