Headlines

सिंधू इज बॅक! पोरीने इतिहास रचला, जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय, दोन सेटमध्येच करेक्ट कार्यक्रम


PV Sindhu wins maiden Japan Open title : जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय बनून बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने इतिहास रचला. घरच्या मैदानावरील बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला हरवत तिने 7 वर्षांनंतर मोठी ट्रॉफी जिंकली.

PV Sindhu
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा विजय मिळवला आहे. अंतिम फेरीत तिने जपानच्या आणि माजी विश्वविजेत्या अकेन यामागुचीचा सरळ सेटमध्ये २१-१७, २१-१७ असा पराभव करत जेतेपद पटकावले. या विजयासह सिंधू जपान ओपनचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

सिंधूसाठी हा विजय केवळ एक ट्रॉफी नसून पुनरागमनाची नांदी आहे. डिसेंबर २०२४ मधील ‘सैयद मोदी इंटरनॅशनल’ स्पर्धेनंतर बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरवरील हे तिचे पहिलेच विजेतेपद आहे. त्याहूनही महत्वाचे म्हणजे २०१९ च्या बॅसल विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर मिळालेली ही तिची पहिलीच मोठी सुपर 750 पातळीवरील ट्रॉफी आहे. त्यामुळे एका मोठ्या विजेतेपदासाठीची तिची सात वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आज संपली आहे. उपांत्य सामन्यात सिंधू २१-१९, १५-१० अशी आघाडीवर होती. त्या वेळी तिची प्रतिस्पर्धी चेन युफेई (चीन) हिने दुखापतीमुळे माघार घेतली.

Maharashtra TimesENG vs IND: वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे बाहेर; लॉर्ड्स वनडेसाठी 23 वर्षीय स्पिनर-ऑलराऊंडरची टीम इंडियात एन्ट्री, नेमका कोण?
अंतिम सामना सिंधूसाठी सोपा नव्हता. कारण आकडेवारी तिच्या विरोधात होती. याआधी सिंधू आणि यामागुची यांच्यात एकूण २४ सामने झाले होते, ज्यात यामागुचीचे १४-१० असे वर्चस्व होते. विशेष म्हणजे गेल्या सहा लढतींपैकी पाच वेळा यामागुचीने सिंधूला हरवले होते. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असूनही यामागुचीवर मात करणे सोपे नव्हते. मात्र आज सिंधूने पूर्णपणे वेगळी रणनीती आखली. पहिल्या सेटपासूनच तिने वेगवान स्मॅश आणि नेटजवळील अचूक शॉट्सच्या जोरावर यामागुचीला ब्रकफूटला ढकलले. दोन्ही सेटमध्ये तिने २१-१७ अशा समान फरकाने विजय मिळवला आणि एकही सेट गमावला नाही.
Maharashtra TimesKapil Dev : उलट आपण आनंदी झालं पाहिजे! रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या चर्चांदरम्यान कपिल देव यांच्या वक्तव्याने वेधलं लक्ष
या विजयामुळे सिंधूचा जागतिक क्रमवारीत मोठा फायदा होणार आहे. गेल्या काही वर्षात दुखापती आणि फॉर्मअभावी तिला संघर्ष करावा लागला होता. पण जपान ओपनमधील या विजयाने तिचा आत्मविश्वास पुन्हा उंचावला आहे. येत्या जागतिक अजिंक्यपद आणि ऑलिम्पिकच्या दृष्टीने हा विजय तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो. सिंधूच्या या ऐतिहासिक विजयामुळे देशातील तरुण खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा