Headlines

​सावंतवाडीत वैश्य समाज संघटनेतर्फे गुणवंत गौरव


​सावंतवाडी / प्रतिनिधी : “मुलांनी छोट्या विचारांत अडकून न राहता आपले विचार मोठे ठेवावेत. वाचनाचा छंद जोपासून थोर व्यक्तींची आत्मचरित्रे वाचावीत आणि त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा. पुस्तके वाचा आणि ती जगा,” असे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केले. वैश्य समाज, सावंतवाडी व हिंदू वैश्यवाणी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
​येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात हा सोहळा उत्साहात पार पडला.
​व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक रमेश भाट, युवा संघटना अध्यक्ष अमित गवंडळकर, महिला अध्यक्षा तनुजा पोकळे, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक प्रतीक बांदेकर, नगरसेविका सौ. सुकन्या टोपले, भेडशीचे उद्योजक बाबा टोपले, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी नगरसेविका पुष्पलता कोरगावकर, कणकवली येथील साहित्यिक महेश काणेकर आणि पंचायत समिती सदस्य प्रशांत सुकी आदी मान्यवर उपस्थित होते.
विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल वैश्य समाज व युवा संघटनेच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन विशेष नागरी सत्कार करण्यात आला.
​९० गुणवंतांचा गौरव
​या सोहळ्यात सुमारे ९० गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत