Headlines

रवी शास्त्रींच्यानेतृत्वात क्रिकेट खेळलाय सुनील शेट्टी, पण आवड बाजूला ठेवत धरली बॉलिवूडची वाट


मुंबई:बॉलिवूडचा ‘अॅक्शन हीरो’ आणि लाडका ‘अण्णा’ अर्थात अभिनेता सुनील शेट्टी आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. ९० च्या दशकात ‘बलवान’, ‘मोहरा’, ‘दिलवाले’ आणि ‘हेरा फेरी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुनील शेट्टीची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द जितकी रंजक आहे, तितकाच त्याचा भूतकाळही रंजक आहे.

मुंबईच्या अंडर-१६ क्रिकेट सामन्यात सहभाग

बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी अभिनय हे सुनील शेट्टीचं पहिलं प्रेम नव्हतं, तर त्याला क्रिकेटचे प्रचंड वेड होतं. लहानपणीच त्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. या खेळातच करिअर करायचं म्हणून तो गंभीर होता. इतकंच नव्हे तर त्यानं त्याने मुंबईच्या अंडर-१६ क्रिकेट सामन्यातही सहभाग घेतला होता.

विशेष म्हणजे ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की, सुनील शेट्टी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली अंडर-१६ क्रिकेट खेळला होता. क्रिकेटमध्येच आपले करिअर घडवण्याचं त्याचं स्वप्न होतं. मात्र, त्या काळात क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी असलेली स्पर्धा आणि आव्हानं लक्षात घेता, केवळ खेळाच्या जोरावर पुढं जाणं कठीण असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि हळूहळू त्याचा प्रवास वेगळ्या दिशेने सुरू झाला.

Maharashtra TimesSunita Ahuja: विनाशकाले विपरीत बुद्धिः, काय चाललंय त्यालाच माहिती, गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार एअरपोर्टवर एकत्र; सुनीता आहुजाचा संताप
विव्हियन रिचर्ड्स यांना पाहून मिळाली फिटनेसची प्रेरणा

सुनील शेट्टीनं एका मुलाखतीत सांगितले होते की, तो जेव्हा साधारण १४ वर्षांचा होता, तेव्हा त्याने वेस्ट इंडिजचे महान फलंदाजसर विव्हियन रिचर्ड्सयांना पाहिलं होतं. रिचर्ड्स यांचे मजबूत खांदे आणि शरीरयष्टी पाहून तो खूप प्रभावित झाला. अशा प्रकारची मजबूत शरीरयष्टी कशी बनवायची, हे विचारल्यावर त्याला वेट ट्रेनिंग करण्याचा सल्ला मिळाला. त्यानंतर त्यानं फिटनेस आणि वेट ट्रेनिंगवर लक्ष केंद्रित केलं होतं, जे पुढे जाऊन त्याच्या ‘अॅक्शन हीरो’ या ओळखीचा मुख्य भाग बनलं.

१९९२ मध्ये ‘बलवान’ चित्रपटातून पदार्पण

फिटनेस आणि व्यवसायाकडं कल असतानाच नशिबानं त्याला बॉलिवूडमध्ये आणून उभं केलं. १९९२ मध्ये ‘बलवान’ या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच्या दणकट शरीरानं आणि दमदार अॅक्शन सीन्सनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

Maharashtra TimesMadhuri Dixit: समोर आला ‘कोण होणार करोडपती’चा प्रोमो, ४२ वर्षांपूर्वी ‘१० ऑगस्ट’ याच दिवशी माधुरी दीक्षितच्या आयुष्यात घडलेली खास गोष्ट
पुढं ‘वक्त हमारा है’, ‘मोहरा’, ‘धडकन’, ‘गोपी किशन’ आणि ‘हेरा फेरी’ यांसारख्या चित्रपटांतून त्याने आपल्या अष्टपैलू अभिनयाची छाप पाडली.

आयपीएल टीम खरेदी करण्याची होती इच्छा

क्रिकेटवरील त्याचे प्रेम चित्रपटसृष्टीत आल्यानंतरही कमी झालं नाही. २००८ मध्ये जेव्हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची सुरुवात झाली होती, तेव्हा सुनील शेट्टीला एक आयपीएल फ्रँचायझी (टीम) खरेदी करायची होती. मात्र, योग्य भागीदार आणि गुंतवणूकदार न मिळाल्यामुळं ते शक्य झाले नाही. त्यानंतर तो ‘सेलिब्रिटी क्रिकेट लीग’ (CCL) मध्ये मुंबई हिरोज संघाचा कर्णधार म्हणून मैदानावर उतरला आणि आपल्या क्रिकेटच्या आवडीला जपलं.

जावईही आहे लोकप्रिय क्रिकेटपटू

क्रिकेटपटू व्हायचं स्वप्न पूर्ण झालं नसलं तरी सुनीलनं लेकीसाठी लेकीसाठी क्रिकेटपटू जावई निवडला. त्याची लेक अथिया शेट्टी आणि लोकप्रिय क्रिकेटपटू के.एल राहुल यांचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं. जावयाच्या सामन्यांदरम्यान सुनील शेट्टी नेहमीच उत्साही दिसून येतो, नेहमीच त्याला प्रोत्साहन देताना दिसतो.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत