सध्या सोशल मीडियावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. एका बोटीवर राहुल गांधींसोबत एक महिला आणि एक लहान मुलगा बसलेला दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीराज सिंह यांनी हा फोटो स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत राहुल गांधींना काही प्रश्न विचारले—’राहुल जी, हा फोटो कुठला आहे? कधीचा आहे? आणि तुमच्यासोबत असणारे हे लोक कोण आहेत?’ गिरीराज सिंह यांच्या या पोस्टनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मोठी लाट आली. पण या फोटोमागचं खरं सत्य काय आहे? राहुल गांधींसोबत दिसणारी ‘ती’ महिला आणि मुलगा नेमके कोण आहेत? काँग्रेसनं यावर काय स्पष्टीकरण दिलंय आणि भाजप नेत्याला कशा शब्दांत सुनावलंय? तेच या व्हिडिओत पाहुयात…