Mumbai- Delhi Expressway: मुंबई ते दिल्ली द्रुतगती माहमार्गावरील मुंबई ते वडोदरा भाग पूर्ण होणार आहे. सध्या काम अंतिम टप्प्यात असून ३१ ऑगस्टपर्यंत प्रवासासाठी मार्ग खुला होईल अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालघर जिल्ह्यात मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी या मार्गावरील मुंबई ते वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम जवळपास पूर्ण झालं असल्याची त्यांनी माहिती दिली. त्यामुळे मुंबई ते वडोदरा प्रवासाचा वेळ अर्ध्यावर येणार आहे. अवघ्या चार तासांत अंतर पार करता येणार आहे. प्रवाशांसाठी एक सुरक्षित, वेगवान आणि कोंडीमुक्त मार्ग उपलब्ध होणार आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत या मार्गाचं काम पूर्ण होईल आणि ३१ तारखेपर्यंत मार्ग प्रवासासाठी खुला होईल अशी माहिती त्यांनी दिली.
१,४०० किमी लांब ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्ग
रविवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाइक आणि मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह पालघरमधील अनेक प्रकल्पांची पाहणी केली. केंद्र सरकार तब्बल १ लाख कोटींचा खर्च करून १,४०० किमी लांब ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्ग बांधत आहे. भारतातील पाच राज्यांमधून हा मार्ग जाणार आहे. हरयाणा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणार आहे. या मार्गचं काम पूर्ण होताच दिल्ही ते मुंबई प्रवासाचं अंतर फार कमी होणार आहे वेगवान कनेक्टिव्हीटीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या दोन औद्योगिक शहरांदरम्यान प्रवास सोपा होणार आहे. हा महामार्ग थेट जेएनपीटी बंदराला जोडलेला असेल. त्यामुळे उत्तर भारतातून जेएनपीटीपर्यंत मालवाहतूक सोपी होणार आहे. त्यासह प्रवासाचा खर्चही कमी होणार आहे.
या मार्गावर मुंबई ते वडोदरा १५७ किलोमीटर लांग द्रुतगती महामार्ग असेल. या पट्ट्यासाठी तब्बल २४,००० कोटी रुपये खर्च आला आहे. या मार्गाचं काम सात टप्प्यांमध्ये केलं जात आहे. त्यापैकी पाच टप्प्यांचं काम पूर्ण झालं आहे. उर्वरित दोन टप्प्यांवरील कामं ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली होती.
ठाणे, भिवंडी, घोडबंदर मार्गांवरील कोंडी फुटणार
सध्या ठाणे, भिवंडी, घोडबंदर मार्गांवरील होणाऱ्या वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. यामुळे प्रवासात वेळ वाचेल व इंधनबचतही होईल. मालवाहतुकीसाठी एक वेगवान मार्ग निर्माण होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बांधकामाच्या प्रगतीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पण त्याचवेळी प्रकल्पाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता हे काम पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे.
या संपूर्ण महामार्गाचं काम पूर्ण झाल्यावर उत्तर आमि पश्चिम भारतातून मुंबईतील बंदरांपर्यंत कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारतातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे असे त्यांनी सांगितले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा