Headlines

झुरळांचा त्रास होतोय? पांढऱ्या तुरटीचा असा करा वापर, घरात एकही झुरळ शोधूनही सापडणार नाही! – how to get rid of cockroach with alum and camphor home remedy


घरात झुरळांचा त्रास वाढला असेल तर काही घरगुती उपाय करून पाहिले जातात.अशात Puneri Tadka यांनी यासाठी एक घरगुती उपाय सांगितला आहे.या उपायात तुरटी, कापूर, खाण्याचा सोडा आणि बोरिक पावडरसारख्या पदार्थांचा वापर करण्याची पद्धत सांगितली आहे. मात्र हे उपाय करताना सुरक्षिततेची काळजी घेणे आणि घराची स्वच्छता राखणे तितकेच महत्त्वाचे आहे.

Effective home remedies for cockroaches
फोटो सौजन्य :- @istock
घरात एखादं-दुसरं झुरळ दिसलं की अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र झुरळांची संख्या वाढू लागली की स्वयंपाकघर, सिंकखालील भाग, बाथरूम, ड्रेनेजजवळची जागा आणि अडगळीचे कोपरे यामध्ये त्यांचा वावर वाढतो. विशेषतः रात्री घर शांत झाल्यानंतर झुरळे बाहेर पडतात. त्यामुळे दिवसा एक-दोन झुरळे दिसत असली तरी लपलेल्या जागी आणखी झुरळे असण्याची शक्यता असते.सोशल मीडियावर Puneri Tadka यांनी झुरळांपासून सुटका करण्यासाठी तुरटी, कापूर, खाण्याचा सोडा, डांबरगोळी किंवा नेप्थलीन आणि बोरिक पावडर यांसारख्या पदार्थांचा वापर करण्याचे अनेक घरगुती उपाय सांगितले जातात.

या उपायांमध्ये घरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर केला जात असल्याने अनेकांना ते करून पाहण्याची उत्सुकता असते. विशेषतः झुरळांना काही सेकंदांत मारल्याचा दावा करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या उपायामागील कल्पना अशी आहे की काही पदार्थांचा तीव्र वास झुरळांना विशिष्ट जागेपासून दूर ठेवू शकतो, तर काही पदार्थ झुरळांच्या संपर्कात आल्यास त्यांच्यावर परिणाम करू शकतात.(फोटो सौजन्य :- @istock)

झुरळे घरात का वाढतात?

झुरळे घरात का वाढतात?

झुरळांना अन्न, पाणी आणि लपण्यासाठी उबदार जागा मिळाली की त्यांची संख्या वाढू शकते. स्वयंपाकघरातील अन्नकण, उघड्या कचरापेट्या, सिंकखाली साचलेले पाणी, गळणारे नळ, ड्रेनेजच्या आसपासची ओलसर जागा आणि भिंतीतील फटी ही झुरळांसाठी अनुकूल ठिकाणे आहेत.त्यामुळे फक्त झुरळांना मारण्यापेक्षा त्यांच्या वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी कमी करणे अधिक महत्त्वाचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करणे, अन्नपदार्थ झाकून ठेवणे आणि ओलावा कमी करणे यामुळे झुरळांना मिळणारे अन्न-पाणी कमी होते.

तुरटी आणि कापूराचा उपाय कितपत उपयोगी?

तुरटी आणि कापूराचा उपाय कितपत उपयोगी?

तुरटी म्हणजे फिटकरी. अनेक घरांमध्ये ती पाण्याच्या शुद्धीकरणासह विविध घरगुती कारणांसाठी वापरली जाते. कापूरालाही तीव्र वास असल्यामुळे तो झुरळांना दूर ठेवण्यासाठी वापरला जातो. मात्र तुरटी किंवा कापूर हे झुरळांसाठी सिद्ध झालेले प्रभावी कीटकनाशक आहेत, असे समजणे योग्य नाही.कापूराचा वास काही काळ झुरळांना एखाद्या भागापासून दूर ठेवू शकतो; परंतु त्यामुळे घरातील झुरळांची वस्ती किंवा अंडी नष्ट होतीलच असे नाही. त्याचप्रमाणे तुरटीची पावडर झुरळांचा कायमचा नायनाट करते, यासाठी ठोस पुरावा नाही.

खाण्याचा सोडा आणि लिंबूचे मिश्रण

खाण्याचा सोडा आणि लिंबूचे मिश्रण

काही घरगुती व्हिडिओंमध्ये खाण्याचा सोडा आणि लिंबाचा रस एकत्र केल्यावर फेस तयार होतो आणि हे मिश्रण झुरळांसाठी प्रभावी असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात लिंबातील आम्ल आणि बेकिंग सोडा यांच्यात प्रतिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड तयार होतो. त्यामुळे मिश्रण फेसाळते.मात्र हे फेसाळणे म्हणजे झुरळांविरुद्ध प्रभावी कीटकनाशक तयार झाले, असा अर्थ होत नाही. त्यामुळे केवळ रासायनिक प्रतिक्रिया दिसते म्हणून त्याला “पॉवरफुल कॉकरोच किलर” समजणे योग्य नाही.

डांबरगोळी किंवा नेप्थलीनबाबत विशेष काळजी

डांबरगोळी किंवा नेप्थलीनबाबत विशेष काळजी

डांबरगोळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेप्थलीनच्या गोळ्या झुरळे किंवा इतर कीटक दूर ठेवण्यासाठी काही ठिकाणी वापरल्या जातात. पण नेप्थलीन हे कीटकनाशक रसायन असून त्याचा वास किंवा वाफ घरातील माणसे आणि पाळीव प्राणी यांच्यासाठीही त्रासदायक ठरू शकते.म्हणून नेप्थलीनची गोळी बारीक करून स्वयंपाकघरातील मिश्रणात घालणे किंवा त्यापासून घरभर स्प्रे तयार करणे हा सुरक्षित घरगुती उपाय मानता येणार नाही. विशेषतः अन्न ठेवण्याच्या जागी, स्वयंपाकाच्या पृष्ठभागावर किंवा मुलांच्या सहज पोहोचेल अशा ठिकाणी अशा पदार्थांचा वापर टाळावा.

बोरिक पावडरचा वापर करताना काळजी

बोरिक पावडरचा वापर करताना काळजी

बोरिक अॅसिड किंवा बोरिक पावडर काही कॉकरोच नियंत्रण उत्पादनांमध्ये वापरली जाते. त्यामुळे झुरळ नियंत्रणामध्ये तिचा उपयोग होऊ शकतो.पण हा वापर कमी प्रमाणात करा.

झुरळांचा त्रास कमी करण्याचे घरगुती उपाय

स्प्रे करण्यापेक्षा हे उपाय अधिक महत्त्वाचे

स्प्रे करण्यापेक्षा हे उपाय अधिक महत्त्वाचे
  • झुरळांची समस्या कमी करण्यासाठी घरात काही सवयी नियमित करणे उपयोगी ठरते.
  • स्वयंपाकघरातील अन्नकण आणि तेलकटपणा रोज साफ करा.
  • रात्री सिंक आणि किचन प्लॅटफॉर्म शक्य तितका कोरडा ठेवा.
  • अन्नपदार्थ हवाबंद डब्यांमध्ये ठेवा.
  • कचरा नियमितपणे घराबाहेर काढा.
  • गळणारे नळ आणि पाइप दुरुस्त करा.
  • भिंतीतील, कपाटामागील आणि पाइपभोवतीच्या फटी शक्य असल्यास बंद करा.
  • ड्रेनेज आणि खिडकीच्या जाळ्या स्वच्छ ठेवा.
  • फ्रिज, गॅस आणि सिंकखालील भाग वेळोवेळी स्वच्छ करा.
मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा