Zaheer Khan on Mohammad Shami : आगामी वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी भारतीय संघात जागा बनवण्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी प्रयत्न करत आहे. मात्र त्याला काही संधी मिळताना दिसत नाहीये, तीन वर्ल्ड कपचा अनुभव असलेल्या शमीला संघात स्थान मिळवण्यासाठी माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने एक सल्ला दिला आहे.

झहीर खान काय म्हणाला?
मोहम्मद शमी याने आशा नाही सोडल्या पाहिजेत. त्याने स्वत:ला ज्या प्रकारे तयार ठेवलंय तोच दृष्टीकोण त्यानेही कायम ठेवला पाहिजे. तुम्ही पुढे कसे जायचे हे पूर्णपणे तुमचाच निर्णय असतो. तुम्ही सामने खेळत असाल आणि चांगली कामगिरी करत असाल, तर तुम्ही निवडीसाठी नेहमीच उपलब्ध असता. मी या गोष्टीकडे याच दृष्टिकोनातून बघतो, असं झहीर खान याने म्हटलं आहे.
West Indies Cricket : दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज अडचणीत, 2027 वनडे वर्ल्डकपमधील पात्रतेचा मार्ग कठीण! कारण काय?
टीम मॅनेजमेंटची विचारसरणी वेगळी असू शकते, पण एक खेळाडू म्हणून तुमची स्वतःची विचारसरणी सर्वात महत्त्वाची असते. तुम्हाला संघाला योगदान द्यायचे असेल तर शमी आता जे करत आहे त्याने ते करणं सुरू ठेवलं पाहिजे. दुखापत हा खेळाचा आणि प्रत्येक खेळाडूच्या प्रवासाचा अविभाज्य भाग आहे. वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल चर्चा होते. जेव्हा एखादा वेगवान गोलंदाज जखमी होतो किंवा खराब फॉर्ममधून जातो, तेव्हा तुमच्या हात जे आहे त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. जोपर्यंत तुम्ही समस्येचे मूळ कारण समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही योग्य दिशेने पुढे जाऊ शकत नाही, असंही झहीर खान म्हणाला.
भारताचे स्टार खेळाडू जखमी
जसप्रीत बुमराहसह वॉशिंग्टन सुंदर, बी. साई सुदर्शन, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांसारखे खेळाडूही वेगवेगळ्या वेळी फिटनेसच्या समस्यांनी त्रस्त आहेत. वर्ल्डकप तोंडावर असताना भारतासाठी प्रमुख खेळाडूंचे दुखणे म्हणजे मोठी समस्याच आहे. हुकमी एक्का असलेला बुमराहसुद्धा दुखापतींमुळे आत बाहेर असतो. तर दुसरीकडे गेले तीन वर्ल्डकप भारताकडून खेळलेला शमी संघात येण्यासाठी आतुर आहे. पण भारतीय संघ व्यवस्थापनाने अजून तरी त्याचा काही विचार करताना दिसत नाहीये.
मोहम्मद शमीची वर्ल्डकपधील कामगिरी
मोहम्मद शमीने आतापर्यंत २०१५, २०१९ आणि २०२३ अशा तीन वनडे वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये त्याने ६ सामन्यात १७ विकेट घेतल्या होत्या. २०१९ मध्ये त्याने फक्त ४ सामने खेळूनही १४ विकेट घेतल्या, ज्यात अफगाणिस्तानविरुद्ध हॅटट्रिकसह ४ विकेट आणि इंग्लंडविरुद्ध ५ विकेटचा समावेश होता. पण २०२३ चा वर्ल्डकप त्याच्यासाठी सर्वात खास ठरला. दुखापतीमुळे सुरुवातीचे ४ सामने न खेळता आल्यावर त्याने पुनरागमन करत ७ सामन्यात २४ विकेट घेतल्या आणि वर्ल्डकपचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला.
IND vs SL : पडिक्कलने शतक ठोकलं, गोलंदाजांनी कंबरडं मोडलं; सराव सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवत भारताचा 6 विकेट्सने विजय
दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध ५/१८ आणि न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीत ५/५४ अशी त्याची कामगिरी लक्षात राहण्यासारखी आहे. एकूणच शमीने वर्ल्डकपमध्ये १७ सामन्यात ५५ विकेट घेतल्या आहेत आणि तो भारतासाठी वर्ल्डकपमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे.

