मुंबई : महिला आशिया कप २०२६ मधील भारताने पहिला सामन्यात थायलंड संघाचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये १५९-९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना थायलंड संघाला भारतीय गोलंदाजांनी ६५ धावांवर ऑल आऊट केले. भारताकडून दीप्ती शर्मा आणि नंदिनी शर्मा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट नावावर केल्या.
थायलंड संघाची कर्णधार थिपचा पुथावोंग हिने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. सुरूवातील स्मृती मानधान आणि शेफाली वर्मा दोघींनीही आक्रमण करत नेपाळच्या संघाला बॅकफूटला ढकलले होते. मात्र थायलंडच्या खेळाडूने बाऊंड्रीलाइनवरून केलेल्या डायरेक्ट थ्रो मुळे स्मृती १९ धावांवर रनआऊट झाली. त्यानंतर आलेल्या प्रतिका रावल हिनेही आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र नाओमीने २२ धावांवर असताना बोल्ड झाली.
Team India Fitness Test : श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शन मोडमध्ये, टीम इंडियाच्या खेळाडूंची फिटनेस टेस्ट, कोण राहिलं गैरहजर? प्रतिका आणि शेफालीयांनी धावांना चांगली गती दिली होती. ३६ चेंडूत ५३ धावांची भागीदारी केली होती. कर्णधार हरमनप्रीत कौर ५ धावांवर आऊट झाली त्यानंतर भारताचा डाव गडगडला. ११२-४ वरून भारताची स्थिती १३७-९ झाली होती. भारती फुलमाली १३ धावा, दीप्ती शर्मा ५ धावा, रिचा घोष ० धावा, प्रेमा रावत ६ धावा करून स्वस्तात परतल्या. शेफालीच्या विकेटनंतर भारताची दाणादाणा उडाली, तिने एकटीने ३६ चेंडूत ६४ धावा (८ चौकार, ३ षटकार) करत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. शेवटला क्रांती गौड आणि श्री चरणी यांनी १६ चेंडूत महत्त्वपूर्ण २२ धावा जोडत दीडशेचा टप्पा ओलांडून दिला.
IND W vs THAI W : शेफाली वर्माच्या अर्धशतकानंतर भारताची घसरगुंडी, थायलंडला दिलं १६० धावांचं आव्हान भारताच्या १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या थायलंड संघाला पहिल्या ओव्हरपासूनच झटके दिले, पॉवर प्लेमध्ये थायलंड संघाने ३ विकेट गमावल्या होत्या. नन्नापत कोनचारोएनकाई हिने शेवटपर्यंत एक बाजू लावून धरली होती. नन्नापत सोडता इतर कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही. अपिसारा सुवानचोनराथी १ धाव, नट्टाकन चंटम ४ धावा, फन्निता माया ६ धावा, नन्नापत कोनचारोएनकाई ४१ धावा, चानिडा सुथिरुआंग ५ धावा, नाओमी हॅमिल्टन १ धाव, सुलेपोर्न लाओमी ६ धाव, नन्नाफट चाइहान ० धाव, सुनिदा चतुरोंग्रट्टाना ० धाव करून आऊट झाले.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा