Sunil Gavskar on No ball : भारतीय संघाचा स्टार खेळाडू रविंद्र जडेजाने श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेमध्ये नो बॉल टाकले होते. यावर बरीच चर्चा होताना दिसत आहे. कसोटीमध्येही नो-बॉलवर फ्री हिट द्यावी असं कोच बहुतुले म्हणाले. मात्र याला विरोध करत माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी खतरनाक पर्याय सुचवलाय. नेमका कोणता सल्ला हे जाणून घ्या.
Sunil Gavskar Ravindr jadeja(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका कसोटीमध्ये रविंद्र जडेजाचे नो बॉल चर्चेत आहेत. जड्डूसोबत दुसऱ्याही स्पिनर्सनीही नो बॉल टाकले होते. एक नो-बॉलमुळे संपूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकतं. याच पार्श्वभूमीवर अनेकांनी कसोटीमध्येही आता फ्री हिट असावी अशी मागणी केली आहे. पण कसोटी मालिका संपल्यावर यावर भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी वेगळाच पर्याय सुचवला आहे. गावसकर नेमका कोणता पर्याय सुचवला आणि फ्री हिट का नको हेसुद्धा सांगितले.
कसोटी क्रिकेटमध्ये फ्री हिटचा नियम आणल्यास फलंदाजांसाठी धावा करणं आणखी सोपं होईल. त्यामुळे हा उपाय फारसा योग्य वाटत नाही. आधीच एका ओव्हरमध्ये बाउन्सरची संख्या दोनपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. त्यामुळे फलंदाजांना धावा करणं सोपं झालं आहे. त्याऐवजी नो-बॉलची चूक वारंवार करणाऱ्या गोलंदाजावर आर्थिक दंड वाढवण्याचा पर्याय अधिक प्रभावी ठरू शकतो. प्रत्येक वेळी चूक पुन्हा झाल्यास दंडाची रक्कम दुप्पट करावी आणि त्यातील निम्मी रक्कम संबंधित बॉलिंग कोचकडूनही वसूल करावी, असा पर्याय विचारात घेता येऊ शकतो. जमा झालेल्या दंडाच्या पैशांचा उपयोग दौरा संपल्यानंतर खेळाडूंच्या वेगळं होण्यापूर्वी होणाऱ्या टीम डिनरसाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे खेळाडूंवर शिस्तीचा दबावही राहील आणि टीम बॉन्डिंगसाठी त्याचा उपयोगही होईल, असं मिश्किलपणे म्हणत सुनील गावसकरांनी हा पर्याय सुचवला आहे.
Team India Fitness Test : श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शन मोडमध्ये, टीम इंडियाच्या खेळाडूंची फिटनेस टेस्ट, कोण राहिलं गैरहजर? दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये रवींद्र जडेजाकडून अनेकदा नो-बॉल टाकण्यात आले. २०२१पासून आतापर्यंत या अनुभवी स्पिनरने तब्बल ८५ नो-बॉल टाकले आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांची ही समस्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोलंबो टेस्टमध्ये पदार्पण करणारा सारांश जैनही नो-बॉलच्या बाबतीत मागे राहिला नाही. त्याच्याकडूनही वारंवार नो-बॉल पाहायला मिळाले. आपल्या करियरच्या पदार्पण सामन्याच पहिलाच बॉल नो-बॉल फेकला आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा