Headlines

गणेशोत्सवातील डीजे आणि अश्लील गाण्यांवर नियंत्रण आणा:मेधा कुलकर्णींची मागणी; गौतमी पाटीलला बोलावणे चुकीचे असल्याचे मत




गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, सार्वजनिक मंडळांकडून मंडप आणि सवाद्य मिरवणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, यंदा पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. नुकतेच पुणे महापालिकेच्या बैठकीत डीजेला कडाडून विरोध करणाऱ्या विद्याधर बापट या नागरिकाला बैठकीतून बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या वादानंतर आता भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनीही या प्रकरणात उडी घेत, पुण्यातील गणेशोत्सवाचे पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत डीजेच्या दणदणाटाला आपला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, उत्सव धार्मिकपणे साजरी झाले पाहिजे, पण दणदणाट जोरात सुरू आहे, पुण्यातील 200 मंडळांनी भूमिका घेतली की, डीजेचा वापर करणार नाही. मात्र, एका संस्थेने गौतमी पाटील यांना बोलावले आहे, हे स्वरूप धारण झाले आहे ते चुकीचे आहे. तसेच अश्लील गाणी वाजवली जातात, ट्रॅफिकमध्ये लोक खोळंबतात. या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आले पाहिजे, डेसिबलचे नियम जे कोर्टाने दिले आहेत ते सगळे पाळले गेले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा साउंड आहे, त्याचे रहिवासी भागात किती डेसिबल असले पाहिजे याचे नियम आहेत, जे कोर्टाचे निर्देश आहेत ते सगळ्यांसाठीच आहेत. नियम फक्त गणेश मंडळांसाठी नाही, कारखाना, बांधकाम सगळ्यांसाठी आहेत. सहन करण्याची पातळी ओलांडली गेली आहे, लोकांची भावना खरी आहे. आजारपण असेल तर सामान्यांना त्रास होतोय, उत्सव सोडून लोकांनी घर सोडून जायचे का? असा सवाल मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. तसेच ज्या अर्थी नियम पाळले जात नाही, शासन होत नाही, त्यामुळे प्रदूषण नियामक मंडळ कमआय पडत आहे. लोकांना त्रास होतोय, पण तरीसुद्धा बेमुरादपणे चालू ठवणार का? तुम्हाला जसे स्वातंत्र्य हवे आहे, तसे दुसऱ्यांना पण स्वातंत्र्य हवे आहे. आपल्या अधिकाराचा दुसऱ्याला त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. समतोल साधला जायला पाहिजे. आजचा धांगडधिंगा उपयोगाचा नाही. उलट प्रबोधनाचे कार्यक्रम करायला पाहिजे, असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे. डीजेच्या दणदणाटावरून भाजपवर निशाणा पुण्याने संपूर्ण जगाला गणेशोत्सवाचा आदर्श घालून दिला असून, काँग्रेसला या उत्सवाचा नेहमीच अभिमान राहिला आहे. मात्र, सध्या परंपरेच्या नावाखाली आणि राजकीय आशीर्वादाने सुरू असलेल्या डीजेच्या दणदणाटामुळे हा उत्सव बदनाम होत असल्याची टीका काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी केली आहे. डीजेच्या या कर्णकर्कश आवाजामुळे वृद्ध, नवजात आणि गतिमंद बालकांसह मुक्या प्राण्यांना प्रचंड त्रास होत असून, आपणच आपली संस्कृती नासवत आहोत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सद्यस्थितीत उन्मादाला बळ देणारे सरकार सत्तेत असून, उत्सवातील या चुकीच्या प्रकारांना विरोध करणाऱ्या सामान्य नागरिकाला चक्क ‘कुत्र्याची’ उपमा देण्यापर्यंत भाजपच्या शहराध्यक्षांची मजल गेल्याचा घणाघात जगताप यांनी केला. सामान्य पुणेकर भाजपचा माज उतरवणार सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी भाजपवर मोठा विश्वास ठेवून त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता दिली; मात्र याच नागरिकांना भाजप नेते कुत्र्यासमान वागणूक देत आहेत, हे धीरज घाटे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाल्याचे जगताप म्हणाले. बैठकीत डीजेला विरोध करणाऱ्या विद्याधर बापट यांच्यावर होत असलेल्या टीकेचा समाचार घेत त्यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. ज्या सामान्य जनतेने भाजपला गल्लीतून दिल्लीच्या सत्तेवर नेऊन बसवले, तेच पुणेकर आता या सत्तेचा माज उतरवून त्यांना पुन्हा गल्लीत आणल्याशिवाय राहणार नाहीत, असा सक्त इशाराही प्रशांत जगताप यांनी यावेळी दिला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत