Headlines

Team India Dressing Room : ही केळी खाल्लीस तर 5 विकेट फिक्स! आधी नाही बोलला पण गुपचूप खाऊन मैदानात उतरला; भारतीय ड्रेसिंग रूममधील भन्नाट किस्सा


Team India News : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये नेहमी भन्नाट किस्से घडतात. जे क्रिकेटर्स त्यांच्या मुलाखतींमधून समोर आणतात, असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Team India Dressing Room
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सामन्याच्या ताणतणावाव्यतिरिक्त अनेक गमतीदार किस्से घडत असतात. असाच एक भन्नाट आणि पोट धरून हसायला लावणारा किस्सा २०१०-११ सालच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील आहे. या किस्स्याच्या केंद्रस्थानी आहेत भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत आणि टीम इंडियाचे तेव्हाचे मसाज थेरपिस्ट लाडके ‘ माने काका ‘. हा प्रसंग ऐकल्यावर क्रिकेटपटू मैदानावर कितीही आक्रमक असले, तरी ड्रेसिंग रूममध्ये ते किती साधे आणि गमतीदार वागू शकतात, याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. हा सगळा किस्सा मुनाफ पटेलने एका मुलाखतीत सांगितला आहे.

माने काकांची जुगाडू पूजा

मुनाफने सांगितले की, “भारतीय संघाचे तत्कालीन मसाज थेरपिस्ट रमेश माने म्हणजेच सर्व खेळाडूंचे लाडके ‘माने काका’ हे अत्यंत श्रद्धाळू आणि पूजापाठ करणारे गृहस्थ होते. सामन्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी ते नेहमी अगरबत्ती लावायचे. दक्षिण आफ्रिकेच्या एका दौऱ्यावर सामन्यापूर्वी ते नेहमीप्रमाणे देवपूजेला बसले. पण, अडचण अशी झाली की परदेशातील त्या ड्रेसिंग रूममध्ये अगरबत्ती लावण्यासाठी कोणतेही स्टँड उपलब्ध नव्हते. जुगाडू माने काकांनी जास्त विचार न करता फळांच्या टोपलीतून चक्क एक केळ बाहेर काढले आणि त्यात ती पेटती अगरबत्ती स्टँडसारखी खोचून ठेवली.”

Maharashtra TimesIndian Cricketers : प्रेम झालं, नातं बहरलं, लग्नापर्यंत गेलेला विषय पण टीम इंडियाच्या ५ क्रिकेटर्सची प्रेमकहाणी अधुरीच राहिली, पाहा कोण?

पाच विकेट्सची गॅरंटी

दरम्यान, हे दृश्य पाहून मुनाफ पटेलच्या मनात खेळाडूंची फिरकी घेण्याचे मनात आले. तो श्रीसंतला गमतीत मोठ्याने म्हणाला, “हे बघ श्री, हे आता साधेसुधे केळ राहिलेले नाही. आज जो कोणी अगरबत्ती लावलेले हे प्रसादाचे केळ खाईल, तो आजच्या सामन्यात नक्कीच पाच विकेट्स काढणार.” त्यानंतर, वेगवान गोलंदाज श्रीसंतने हे ऐकले. गोलंदाजांसाठी पाच विकेट्स घेणे हे एखाद्या फलंदाजाच्या शतकाइतकेच मोठे असते. पण सुरुवातीला तो थोडा थबकला. “नाही यार, त्यात अगरबत्ती खुपसलेली आहे, त्याची राख पडली असेल. मी नाही खाणार ते केळ,” असे म्हणत त्याने तिथून काढता पाय घेतला.

Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi Captaincy : बॅटिंग, बॉलिंगनंतर आता कॅप्टन्सीतही १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी चमकला, दमदार निर्णयाची हवा; नेमकं काय केलं?

श्रीसंतची भाबडी आशा आणि भन्नाट शक्कल

“पाच विकेट्सचे आमिष मात्र श्रीसंतच्या डोक्यातून जात नव्हते. अवघ्या पाच मिनिटांतच तो पुन्हा त्या फळांच्या टोपलीजवळ आला. त्याने इकडे-तिकडे पाहिले आणि अत्यंत हुशारीने ती अगरबत्ती एका दुसऱ्या ताज्या केळ्यामध्ये खोचली. त्यानंतर अगरबत्ती काढलेले ते पहिले प्रसादाचे केळ त्याने सोलून खाल्ले.”, असा भन्नाट किस्सा पटेलने सांगितला आहे. दरम्यान, देवाच्या समोर ठेवलेले आणि आशीर्वाद लाभलेले ते केळ खाल्ल्यावर आपल्याला आज खरोखरच पाच विकेट्स मिळतील, अशी भाबडी आशा श्रीसंतच्या मनात आली होती.

मुनाफने पुढे सांगितल्याप्रमाणे त्या सामन्यात श्रीसंतला पाच विकेट्सचा टप्पा काही गाठता आला नाही, हे खरे असले तरी त्याच्या या मजेशीर किस्स्यामुळे संपूर्ण ड्रेसिंग रूममध्ये मात्र एकच हशा पिकला होता.