Headlines

मराठवाड्यात पावसाने फिरवली पाठ; पावसाअभावी पिके धोक्यात, शेतकरी चिंतेत


Chhatrapati Sambhajinagar: सध्या ऐन पावसाचे दिवस चालू असताना. मराठवाड्यात मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चांगलाच चिंतेत आहे.पावसाच्या दिवसात ऐन शेती चालू असताना खरीप पिकांवर मात्र त्याचा चांगलाच परिणाम होत आहे. मराठवाड्यात बुधवारपर्यंत सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

_पावसाअभावी पिके धोक्यात, मराठवाडा
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली असून खरीप पिकांवर ताण पडला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत तुरळक पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणीसाठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात रविवारी सायंकाळी तुरळक पाऊस झाला.

दहा दिवसांपासून पावसाची विश्रांती

मराठवाड्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. शेवटच्या टप्प्यातील पेरणीला हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. मात्र, दहा दिवसांपासून विभागात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यभरात कमी-अधिक स्वरूपात पाऊस सुरू असला तरी मराठवाड्यात पाऊस नाही. तुरळक सरी पिकांसाठी फायदेशीर ठरत नसल्यामुळे शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पिकांवर प्रतिकूल परिणाम

पिके वाढीच्या अवस्थेत असताना पाऊस थांबल्यामुळे वाढीवर प्रतिकूल परिणामझाला आहे. तसेच पिकांवर अळी, बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. या हंगामात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ३७९.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जालना ३९३, बीड २७२.२, लातूर २६४, धाराशिव २८९, नांदेड ४६९, परभणी ३३९ आणि हिंगोली ४५५ मिमी असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे.

लातूर जिल्ह्यात सर्वाधिक तूट निर्माण झाली

विभागात आतापर्यंत सरासरी ४६७.४ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ३५८.८ मिमी पाऊस झाला आहे. जवळपास ४९ मिमीची तूट निर्माण झाली असून पावसाची टक्केवारी ८८ टक्के आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक तूट निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ४१३ मिमी पाऊस अपेक्षित असताना केवळ २६४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यातही ४६७ मिमी पाऊस अपेक्षित असताना ३३९ मिमी पाऊस झाला आहे.

Maharashtra TimesPune News : 20 उद्योग चाकणबाहेर जाणार या निव्वळ अफवा, उद्योगमंत्र्यांचा दावा, खड्डे-वाहतूक कोंडीवर उपाययोजना जाहीर

मोठ्या दहा धरणात ६८ टक्के पाणीसाठा

जायकवाडी धरणात उर्ध्व भागातील धरणातून होणारी आवक थांबली असून प्रकल्पात ९३.७० टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना २६.२९, येलदरी ६१.०५, सिद्धेश्वर २६.२७, माजलगाव २१.९, मांजरा १५.७६, पैनगंगा ६६, मानार ५८.६३, निम्न तेरणा २५.९२, विष्णुपुरी ९५.२० असा धरणनिहाय पाणीसाठा झाला आहे. सिना कोळेगाव धरणात अद्याप पाणीसाठा झालेला नाही. मोठ्या दहा धरणात ६८ टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

Maharashtra TimesMumbai News : बेस्ट बसच्या धडकेत हेमंत जोशींचा अंत, कुटुंबाला आठ वर्षांनी न्याय, 5.25 कोटींची रक्कम दोन महिन्यात देण्याचे BMC ला आदेश

१९ ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात तुरळक पावसाच्या सरी

नांदेड आणि बीड जिल्ह्यात अधिक तूट निर्माण झाली आहे. वाढती तूट आणि पावसाचा खंड चिंताजनक ठरला आहे.भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार १९ ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकतो. मात्र, इतर जिल्ह्यात पावसाचा खंड कायम राहण्याची शक्यता आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा