![]()
प्रत्येक नावेला कुठेतरी छिद्र असतेच. एखादे छिद्र अचानक धोकानिर्माण करते आणि नावेचे नुकसान होते. तर एखादे छिद्र फक्तनावालाच असते. नाव तशाही स्थितीत सुरक्षितपणे प्रवास करते.कुटुंबसुद्धा एका नावेसारखे आहे. ते या संसार सागरात राहते. यानावेला छिद्र आहे. या छिद्रातून आत पाणी येऊ लागते, तेव्हा समंजसनावाडी ते पाणी वेळेतच बाहेर उपसून टाकतो. कुटुंबातही भोग,विलास, वाईट गुणांचे पाणी त्या छिद्रातून आत येणारच. मुले भरकटूशकतात. किंबहुना मुले किंवा तरुणच कशाला, मोठी आणि वृद्धमाणसेही कधीकधी चांगला मार्ग सोडतात. अशा वेळी कुटुंबातीलआनंद कसा टिकवून ठेवायचा? म्हणूनच, एका समंजसनावाड्यासारखे सावधगिरीने बोटीला वल्हवा. सतर्कता ठेवा. नावेतीलअतिरिक्त पाणी लगेच बाहेर फेकून द्या. नाहीतर आयुष्यभर असेचवाटेल की नाव नदीत पोहत आहे. वास्तविक नदीच नावेत शिरेल. तेव्हाबुडणे अटळ होईल. म्हणूनच कुटुंबातील आनंद ,आपुलकी फुलाच्यासुगंधासारखी असते. ती डोळ्यांना दिसत तर नाही. पण जीवनाला एकसुंदर तृप्ती देऊन जाते.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कुटुंबाबद्दलची आपुलकी फुलांच्या सुगंधासारखी असते
