Ajinkya Rahane Retirement News : भारताचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे याने निवृत्तीची घोषणा केली आहे. खेळाशी प्रामाणिक राहिलेल्या डोंबिवलीकरने अनेक मैदाने गाजवली, पण तो नेहमी जमिनीवर राहिला. गेले अनेक वर्ष संघाक कमबॅक करण्यासाठी धडपड करणाऱ्या अजिंक्यने आज निवृत्तीची घोषणा केली.

अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
आयुष्याचं सत्य हेच आहे की प्रत्येक गोष्टीला सुरुवात असते आणि शेवटही असतो. जेव्हा ती वेळ येते तेव्हा ती स्वीकारून पुढे जावंच लागतं. बॅटिंग करताना मी नेहमीच टायमिंगवर विश्वास ठेवला आहे आणि त्याचं महत्त्वही नेहमी समजून घेतलं आहे. आज मला वाटतं की माझ्यासाठी पुढे जाण्याची आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याची योग्य वेळ आली आहे. डोंबिवलीहून फक्त प्रॅक्टिससाठी प्रवास करणाऱ्या त्या लहान मुलापासून आजपर्यंत मी या खेळासाठी माझं सर्वस्व दिलं.
Sharmila Dhankar : दोन वर्षांची असताना पोलिओ, घरगुती हिंसाचाराच्या होरपळीतून सुवर्णझेप; शर्मिला धनखडचा संघर्षमय प्रवास
दरोज, प्रत्येक इनिंगमध्ये, फलंदाजीची मिळालेली प्रत्येक संधी… माझं स्वप्न नेहमीच भारताची कॅप घालण्याचं होतं. मी एकाच नियमाने आयुष्य जगलो – देश आणि संघाला नेहमी स्वतःपेक्षा आधी ठेवायचं. मी हा खेळ पूर्ण प्रामाणिकपणे खेळलो. आणि माझा एक ठाम विश्वास आहे की जर तुमचा उद्देश चांगला असेल तर खेळही तुम्हाला नेहमी साथ देतो. फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून भारतीय क्रिकेटने प्रचंड प्रगती केली आहे. गेल्या वीस वर्षांत त्याचा एक भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे. भारतीय क्रिकेटपटू म्हणून माझा अध्याय इथे संपला तरी खेळासोबतचा माझा प्रवास संपत नाही. पुढच्या पीढिला मदत करण्यासाठी, या खेळाने मला शिकवलेल्या मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी आणि ज्याने मला सर्व काही दिलं त्या खेळाला परत देण्यासाठी मी उत्सुक आहे.
Jayden seales : 18 धावांत 5 विकेट्स, पाकिस्तानचा कर्दनकाळ ठरला; कोण आहे वेस्ट इंडिजचा स्टार जेडन सील्स?
मुंबईतील एका लहान खेळाडूपासून भारतासाठी खेळण्यापर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी खूप मोठा सन्मान होता. वाटेत बरेच विजय आणि पराभवही झाले. पण क्रिकेट खेळण्याचा आनंद, वेगवेगळ्या संघांचा भाग असणे आणि आयुष्यभराच्या आठवणी निर्माण करणे… हेच माझ्या करिअरचं सर्वात मोठं समाधान आहे.
BCCI, MCA, माझे सहकारी, माझे प्रशिक्षक, प्रत्येक IPL फ्रँचायझी, राधिका, माझं संपूर्ण कुटुंब, मित्र आणि ज्यांनी माझ्यासोबत साथ दिली त्या प्रत्येकाला मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक चढ-उतारात मला पाठिंबा देणाऱ्या सर्व क्रिकेट चाहत्यांचे खूप खूप आभार. अजिंक्य म्हणजे अजिंक्य, पण क्रिकेटने मला पराभवही अनेकदा दाखवला आहे. क्रिकेटपटू म्हणून आपण यशापेक्षा अपयशी जास्त होतो. माझ्या संघाचे सामने हरले आहेत. माझ्याकडून चुका झाल्या आहेत, पण एक जागा अशी आहे जिथे मी कधीच हरलो नाही… आणि ती म्हणजे तुमच्या मनात. तुमचं प्रेम, विश्वास आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद, असं अजिंक्यने म्हटलं आहे.
दरम्यान, अजिंक्य रहाण याने आपल्या करियरमध्ये ३१ ऑगस्ट २०११ मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध टी२० मधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अवघ्या ३दिवसांनी ३ सप्टेंबर २०११ रोजी कार्डिफमध्ये त्याने वनडे पदार्पणही इंग्लंडविरुद्धच केले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने २२ मार्च २०१३ दिल्ली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करत तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अजिंक्य रहाणेने कसोटीत ८५ सामने खेळत ५,०७७ धावा केल्या. यात १२ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या १८८ आहे. वनडेत त्याने ९० सामन्यात २,९६२ धावा केल्या असून त्यात ३ शतके आणि २४ अर्धशतके आहेत. टी-२० मध्ये त्याने २० सामने खेळून ३७५ धावा केल्या, ज्यात १ अर्धशतक आणि ६१ ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

