Headlines

Balcony Enclosure Rules Explained; फ्लॅटची बाल्कनी तोडून बेडरूम वाढणे, ग्रिल लावणे महागात पडू शकते! हायकोर्टाने सरकारला कोणते निर्देश दिले? येथे वाचा


Housing Society Rules: फ्लॅट किंवा अपार्टमेंट खरेदी केल्यावर तुमच्या बाल्कनीला ग्रील, काच, रेलिंग किंवा शेड लावण्यासाठी सोसायटीच्या परमिशनची गरज असते का? असे बदल करण्यापूर्वी सोसायटीचे नियम, महानगरपालिकेचे नियम आणि आवश्यक परवानग्या तपासणे महत्त्वाचे आहे.

Balcony Enclosure Rules Explained
फ्लॅटची बाल्कनी तोडून बेडरूम वाढणे, ग्रिल लावणे महागात पडू शकते!(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Property Rights: कोणत्याही नव्या हाऊसिंग सोसायटीत आपण घर, फ्लॅट किंवा अपार्टमेंट खरेदी केल्यावर बाल्कनीवर सेफ्टी जाळी, स्टेनलेस स्टीलच्या काचेच्या जाळ्या किंवा शेड्स बसवतात किंवा बाल्कनीचा विस्तारही करतात. पण आधीच बांधलेल्या फ्लॅटमध्ये असं करता येतं का? आपल्या फ्लॅटमध्ये कोणतेही बदल करण्यापूर्वी गृहनिर्माण संस्थेचे नियम, मंजूर बांधकाम आराखडे आणि महानगरपालिकेचे नियम समजून घेतले पाहिजे, कारण परवानगीशिवाय कोणतंही काम केल्यास कायदेशीर वाद होऊ शकतात.

फ्लॅटमध्ये बदल करताना नियम काय

बरेच लोक आपल्या फ्लॅटमध्ये, विशेषतः नवीन घरात शिफ्ट होताना आपल्या शेजारी किंवा इतर ठिकाणच्या बाल्कनी पाहून स्वतःच्या बाल्कनीत बदल करतात. याबद्दल अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की, नियम आणि परवान्यांचे पुनरावलोकन न करता अशाप्रकारचे बदल केल्यास कायदेशी वाद होऊ शकतात. त्यामुळे, न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फ्लॅट मालक परवानगीशिवाय कोणते बदल करू शकतात याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत.

Maharashtra TimesGold Silver Rate: फेडच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी हालचाल; सोन्याला झळाळी; चांदीत मात्र नरमाई, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर
त्याचप्रमाणे, भारतातील घर खरेदीदार आणि फ्लॅट मालकांना या प्रकरणातून महत्त्वाचा संदेशही मिळतो की, फ्लॅटची मालकी तुमच्याकडे असली तरीही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतेही बाह्य बदल करू शकता असं नाही, त्याआधी सर्व नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे.

फ्लॅटचा मालक मर्जीनुसार कोणताही बदल करू शकतो?

एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एका फ्लॅट मालकाने बिल्डरने परवानगीशिवाय बांधलेली मोकळी गच्ची झाकली, असे न्यायालयाला आढळून आले. त्यानंतर, कोर्टाने परवानगीशिवाय केलेले असे बांधकाम नियमांच्या विरोधात आहे आणि काढून टाकण्याचे आदेश दिले.

मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की, फ्लॅट तुमचा असला तरी इमारतीचे अनेक भाग सोसायटीचे नियम, बिल्डर-खरेदीदार करार, महानगरपालिकेचे बांधकाम नियम, अपार्टमेंट कायदे आणि सुरक्षा नियमांच्या अधीन असतात. इमारतीचे बाह्य स्वरूप, रचना, सामायिक जागा किंवा सुरक्षिततेवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही बदलांसाठी प्राधिकरण किंवा सोसायटीची परवानगी घेतली पाहिजे.

Maharashtra Times8th Pay Commissionचा अंतिम अहवाल कधी? सरकारवर शिफारशींचे बंधन नाही, पगारवाढीचे काय? एरियरवरही प्रश्नचिन्ह
न्यायालयाने म्हटले आहे की, अनेक फ्लॅट मालक नियमांची माहिती नसताना बाल्कनीवर जाळ्या, स्टेनलेस स्टील काच किंवा छतावर शेड्स बसवतात, किंवा घरातील काही भिंतींमध्ये बदल करतात. अशा बदलांसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याचे कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिले जेणेकरून कोणत्या बदलांसाठी परवानगी आवश्यक असल्याचे सर्वसामान्य जनता आणि प्रशासन या दोघांनाही कळेल.

तुम्ही बाल्कनीला सेफ्टी ग्रिल लावू शकता का?

सोसायटीच्या नियम आणि स्थानिक कायद्यांवर हे पूर्णपणे अवलंबून आहे. सोसायटीने परवानगी दिली, ग्रील मंजूर डिझाइननुसार असेल आणि त्यामुळे इमारतीच्या बाह्य स्वरूप किंवा सुरक्षिततेवर परिणाम होत नसेल, तर प्राधिकरण किंवा सोसायटीच्या आदेशानुसार ग्रील लावली जाऊ शकते. म्हणजे केवळ तुमच्या शेजाऱ्याने ग्रील बसवले म्हणून तुम्हालाही परवानगीशिवाय तसे करण्याचा अधिकार आहे, असे नाही.

त्याचवेळी, लक्षात घ्या की बाल्कनीला काच, वीट, ॲल्युमिनियम किंवा छताने पूर्णपणे बंद करणे सेफ्टी जाळीपेक्षा वेगळे असते. यामुळे इमारतीचे बाह्य स्वरूप बदलू शकते, त्यामुळे प्राधिकरण किंवा सोसायटीकडून परवानगी घेतली पाहिजे. मंजूर बांधकाम योजनेच्या विरुद्ध कोणतेही बदल केल्यास तुम्हाला काढून टाकण्यासाठी नोटीस किंवा आदेशही मिळू शकतो.

Maharashtra Timesघरभाड्यावर TAX सूट हवी असेल तर ही 4 कागदपत्रे जपून ठेवा! बनावट Rent Receipt देणारे आयकर विभागाच्या रडारवर

परवानगीशिवाय बदल करण्याचे धोके

आवश्यक परवानगीशिवाय फ्लॅटमध्ये बाह्य बदल केल्यास महानगरपालिकेची नोटीस, सोसायटीसोबत वाद, कायदेशीर कारवाई, बदल काढून टाकण्याचे आदेश, मालमत्ता विकण्यात अडचणी किंवा कागदपत्रांच्या प्रक्रियेत विलंब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, कोणतेही छोटे-मोठे बदल करण्यापूर्वी नियम आणि आवश्यक परवानग्या तपासून घेणे शहाणपणाचे ठरेल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा