Ashadhi Ekadashi Devendra Fadnavis Mahapooja : भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसर अधिक प्रशस्त आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे काळाची गरज आहे. त्यादृष्टीने यावर्षीच पंढरपूर मंदिर कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून, ते पूर्ण झाल्यानंतर दर्शन व्यवस्था अधिक सुलभ, सुव्यवस्थित आणि सुरळीत होईल.” अशी आशाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पंढरपूर : देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची सपत्नीक शासकीय महापूजा केली. महाराष्ट्रावर विठूमाऊलीची कृपादृष्टी सदैव राहो, राज्यात सुख-समृद्धी नांदो, शेतकरी सुखी-समृद्ध होवो आणि जनतेच्या जीवनात आनंद आणि समाधान लाभो, अशी प्रार्थना त्यांनी विठूमाऊलीच्या चरणी केली.
“मोदींनी सुरु केलेल्या विकासाला बळ मिळो”
पंतप्रधाान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तरुणाईसाठी सुरु केलेल्या विकास आणि नव्या संधींच्या प्रवासाला अधिक बळ मिळावे, प्रत्येक युवक-युवतीच्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात आणि विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प अधिक वेगाने साकार व्हावा, यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल-रखुमाईच्या चरणी प्रार्थना केली.
माने दाम्पत्य मानाचे वारकरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर येथे मानाचे वारकरी दाम्पत्य श्री. बाळासाहेब माने आणि श्रीमती प्रभावती माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आले.
वारीने नवा उच्चांक गाठला
“यंदा वारीने नवा उच्चांक गाठला असून 25 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत भाविकांची रांग लागली. मात्र सर्व भाविकांची अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. विठ्ठल नामाचा गजर करत भाविक दर्शन घेत आहेत. जगाच्या पाठीवर असा आनंदाचा सोहळा दुसरा कुठेही नाही, जिथे कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघतात.” अशा भावना यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
पंढरपूर मंदिर कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात करणार
“पंढरपूर येथे भगवान श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता अधिक प्रशस्त परिसर आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे काळाची गरज आहे. त्यादृष्टीने यावर्षीच पंढरपूर मंदिर कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून, ते पूर्ण झाल्यानंतर दर्शन व्यवस्था अधिक सुलभ, सुव्यवस्थित आणि सुरळीत होईल.” अशी आशाही फडणवीसांनी व्यक्त केली.
वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा मानत राज्य शासनाने यंदा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री आकाश फुंडकर, आमदार समाधान आवताडे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा