जयंत पाटील – विनोद तावडे गुप्त भेटीनंतर फडणवीसांचा दिल्ली दौरा, नेमकं काय घडलं? – cm devendra fadnavis and amit shah meeting in delhi about maharashtra politics explained
जयंत पाटील – विनोद तावडे गुप्त भेटीनंतर फडणवीसांचा दिल्ली दौरा, नेमकं काय घडलं? – cm devendra fadnavis and amit shah meeting in delhi about maharashtra politics explained
जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडली. या गुप्त बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला आणि अमित शाह यांच्यासोबत तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चा केल्याचंही सांगितलं जातंय. एकीकडे केंद्रात आणि राज्यात विकास प्रकल्पांना गती दिली जात असताना, दुसरीकडे आगामी राजकीय गणितांची जुळवाजुळवही पडद्यामागे सुरू आहे असं यामुळे बोललं जाऊ लागलं. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच झालेला दिल्ली दौरा विशेष चर्चेत राहिला आहे. दिल्लीतील या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ‘नर्मदा प्रकल्पाची’ महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामुळे महाराष्ट्राला खास गिफ्टही मिळालंय. फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात नेमकं काय घडलं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया..