Headlines

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शन मोडमध्ये, टीम इंडियाच्या खेळाडूंची फिटनेस टेस्ट, कोण राहिलं गैरहजर?


Team India Fitness Test News : भारत आणि श्रीलंकेमधील कसोटी मालिका आताच संपली. या मालिकनंतर बीसीसीआय आता ॲक्शन मोडमध्ये आलेलं दिसत आहे. ४८ तासांच्या आतच वर्षभरासाठीच्या करारामधील खेळाडूंची फिटनेस टेस्ट झाली. कोणते खेळाडू गैरहजर राहिले जाणून घ्या.

Team India Fitness Test
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा समारोप झाल्यानंतर ४८ तासांच्या आत भारतीय क्रिकेट संघाच्या वार्षिक करारातील अव्वल खेळाडूंची शनिवारी फिटनेस चाचणी घेण्यात आली. देशांतर्गत क्रिकेटच्या मोसमाआधी बेंगळुरूतील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये ही चाचणी झाली. भारताच्या कसोटी संघातील तसेच इतर नियमित खेळाडूंनी आगामी आठ महिन्यांचा व्यग्र मोसम लक्षात घेत या फिटनेस चाचणीत भाग घेतला. देशांतर्गत क्रिकेटचा नवा मोसम २०२७च्या इंडियन प्रीमियर लीगपर्यंत (आयपीएल) रंगणार आहे.

फिटनेस चाचणीत काय ?

अनिवार्य फिटनेस तपासणीत ‘ब्रोंको टेस्ट, ‘२ किलोमीटर धावणे’, ‘यो-यो टेस्ट’ आणि खेळपट्टीवर एकेरी, दुहेरी धावा घेतात तसेच चपळ धावणे, अशा क्रिकेटशी संबंधित ड्रिल्सचा समावेश होता. ‘ब्रोंको टेस्ट’ मध्ये सुरुवात, २० मीटर, ४० मीटर आणि ६० मीटरवर ‘कोन’ लावले जातात. खेळाडूंना न थांबता पाच सेटमध्ये ० ते २० मीटर आणि परत, त्यानंतर ४० मीटर आणि ६० मीटरपर्यंत धाच पूर्ण करावी लागते. यामध्ये एकूण १२०० मीटरचे अंतर पाच मिनिटे ३० सेकदांत पूर्ण करावे लागते. ‘यो-यो टेस्ट’चे मानक बऱ्याच काळापासून १६.५ आहे तर दोन किलोमीटर धावण्याचे अंतर १० मिनिटांच्या आत पूर्ण करावी लागते.

Maharashtra TimesIND vs PAK : 5 सप्टेंबरला नेमकं काय होणार? भारत-पाक सामन्याआधी कोच अमोल मुझुमदारांचं मौन, मोठा निर्णय बाकी

चाचणीला कोण, कोण ?

अनुभवी अष्टपैलू रवींद्र जाडेजा, यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत, सलामीवीर यशस्वी जयस्वाल यासह भारताच्या टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर, मयर्यादित षटकांच्या भारतीय संघातील रिंकू सिंग, संजू सैमसन आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्यासह अनेक खेळाडूंनी फिटनेस चाचणीत मेहनत घेतली.

Maharashtra TimesWorld Cup 2027 : वनडे वर्ल्डकपसाठी BCCIचा मास्टरप्लॅन, मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूचा बॅकअप प्लॅन म्हणून विचार, नेमका कोण?

दृष्टिक्षेप

  • इंग्लंड दौऱ्यावर जायबंदी झालेला (स्नायूंची दुखापत) प्रिन्स यादव ॥ता फिट झाला आहे. तो निवडीसाठी उपलब्ध असेल
  • नवी दिल्लीत भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भाग घेईल
  • तसेच त्यानंतर टी-२० संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानला रवाना होईल
  • त्याचवेळी मयादित षटकांचा आणखी एक भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळेल
  • सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुद्दुचेरी येथे भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यात मालिकेचे आयोजन होईल

Maharashtra TimesAsia Cup 2026 : आशिया कपमध्ये भारत वि. थायलंड आज पहिला सामना; किती वाजता आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

हेदेखील महत्त्वाचे

जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि नितीश कुमार रेड्डी हे खेळाडू पूर्णपणे फिट झाल्यानंतरच या फिटनेस चाचण्यांमध्ये भाग घेतील. हे खेळाडू सध्या दुखापतीतून सावरण्यासाठी ‘रिहब’ प्रक्रियेतून जात आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना सध्या या तपासणीतून सूट देण्यात आली आहे; कारण त्यांनी श्रीलंकेविरुद्ध सलग दोन कसोटी सामन्यांत दीर्घकाळ गोलंदाजी केली होती.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा