Headlines

कोकणवासियांची ‘कन्फर्म’साठी आराधना सुरू, गणपतीसाठी आरक्षण खुले; रेल्वे आणि एसटीचं वेळापत्रक जाहीर| Maharashtra Times


कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना वेळेत तिकीट मिळावं यासाठी मध्य रेल्वेनं आणि एसटी महामंडळानं आपलं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

कोकण रेल्वे गणेशोत्सव
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गौरी-गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वे आणि एसटी गाड्यांचे आरक्षण या आठवड्यात सुरू होणार आहे. यंदा गणेश चतुर्थी सोमवार, १४ सप्टेंबरला आहे. चतुर्थीआधीच्या शनिवार-रविवारी प्रवासाला सर्वाधिक पसंती असते. शनिवार १२ सप्टेंबरचे आरक्षण १४ जुलैला, शुक्रवार ११ सप्टेंबरचे आरक्षण १३ जुलैला सुरू होणार आहे. त्याकडे कोकणवासींचे लक्ष लागले आहे. तर एसटीच्या विशेष बसगाड्यांचे आरक्षण परळ येथे सुरू झाले आहे.

कसं असेल वेळापत्रक?

भारतीय रेल्वेच्या नियमाप्रमाणे, प्रवासाच्या तारखेच्या ६० दिवस आधी आरक्षण सुरू होते. यानुसार, ११ सप्टेंबरच्या प्रवासासाठी १३ जुलैला, १२ सप्टेंबरसाठी १४ जुलैला, १३ सप्टेंबरसाठी १५ जुलैला आणि गणेश चतुर्थी अर्थात १४ सप्टेंबरच्या प्रवासासाठी १६ जुलैला आरक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे गणरायाच्या तयारीसाठी कोकणात जाताना ‘कन्फर्म’ आसनासाठी प्रवाशांना तयारी करावी लागणार आहे. ‘मध्यरात्रीनंतर सुटणाऱ्या गाड्यांसाठी पुढील दिवसाच्या तारखेचे आरक्षण करावे. गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणाऱ्या विशेष गाड्या आणि त्यांचे आरक्षण स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे,’ असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra TimesMaharashtra Railway Bridges: महाराष्ट्र होणार रेल्वे फाटकमुक्त, तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाणपूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

एसटी महामंडळाकडूनही बस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मुंबई विभागातील परळ आगाराने जादा बस गाड्यांच्या आरक्षणाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार १२ जुलै रोजी १० सप्टेंबर, १३ जुलै रोजी ११ सप्टेंबर, १४ जुलै रोजी १२ सप्टेंबर आणि १५ जुलै रोजी १३ सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या जादा बसचे आरक्षण सुरू होणार आहे.

महिलांना सवलत

प्रवाशांना जादा बसगाड्यांचे आरक्षण ऑनलाइन, बस स्थानके, आगार कार्यालये तसेच प्रवासी सहाय्यता केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के सवलत लागू राहणार आहे. गणेशभक्तांसह प्रवाशांच्या सोईसाठी महामंडळाने यापूर्वीच नियोजन केले आहे. शेकडो बसगाड्या गणेशभक्तांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यात सामूहिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्वरूपातील आरक्षणाचा सहभाग आहे, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार मध्य रेल्वेनं त्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दररोज, सकाळी ८.०० वाजता आयआरसीटीसीच्या अधिकृत मोबाईल अॅप किंवा संकेतस्थळावर बुकिंग सुरू होईल. तसचं, रेल्वे स्थानकांवरील तिकीट काउंटरवरही बुकिंग सुरू असणार आहे.

Maharashtra TimesJejuri Accident : पंढरपूर वारीत ट्रकची धडक, जेजुरीत तीन महिला वारकऱ्यांचा करुण अंत; तापाच्या गोळ्यांनी चालकाला ग्लानी आल्याची माहिती

आसनगाव-वासिंद दरम्यान लोकल खोळंबा

मध्य रेल्वेच्या आसनगाव आणि वासिंद स्थानकांदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने दुपारी मध्य रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेससह लोकल गाड्या खोळंबल्या. यामुळे प्रवाशांनी रुळांवर उतरून चालत जाण्याचा पर्याय निवडला. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करत जवळपास अर्ध्या तासानंतर बंद इंजिन मार्गातून हटवले. त्यानंतर रेल्वे सेवा सुरळीत झाली. मात्र प्रवाशांचे हाल झाले. रविवार दुपारची वेळ असल्याने, सुट्टीच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल धावत असल्याने सेवेवर फार परिणाम झाला नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा