Headlines

काय करतोय यार ईशान! अभिषेक शर्मा किशनवर चांगलाच भडकला, सामना रद्द पण Video तुफान व्हायरल


मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने मालिकेतील पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरुद्ध ७ बाद १८९ धावा केल्या होत्या. भारत फलंदाजी करत असताना पावसाची रिपरिप सुरूच होती. परंतु पहिल्या डावानंतर पावसाने चांगलाच जोर धरला आणि इंग्लंड खेळायला येण्याआधीच सामना रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. या सामन्यामध्ये भारताची खराब सुरूवात झाली होती. संजू फेल गेल्यावर ईशान किशन त्याच्या कॉलमुळे रनाआऊट झाला. त्यावेळी अभिषेक शर्माने त्याला जाऊन खडसावलं. यादरम्यान दोघांमध्ये झालेल्या बोलण्याचाा व्हिडीओ समोर आला आहे.

अभिषेक आणि ईशानमध्ये झालेला संवाद

अभिषेक विचारतो, “पोहोचला की नाही?”
त्यावर ईशान म्हणतो, “मला नाही माहीत”
अभिषेक पुन्हा विचारतो, “क्लोज आहे?”
ईशान उत्तर देतो, “हो, क्लोज आहे”
अभिषेक पुढे म्हणतो, “काय करत आहेस यार ईशान”
ईशान आपली चूक मान्य करत म्हणतो, “चेंडू पुढे होता ना, माझा कॉल होता”
अभिषेक म्हणतो, “पण बघ तर खरा, तो कुठे उभा आहे”

ईशान किशन आयर्लंडमध्येही रन आऊट झाला होता. का म्हणजेच बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या रँकिंगनंतर पहिल्या स्थानी त्याने झेप घेतली आहे. त्यामुळे त्याच्याकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो अपयशी ठरला असून आता पुढील सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra TimesIND vs ENG 1st T20 : भारताने भर पावसात इंग्लंडला धुतलं, अभिषेक शर्माकडून सिक्सरची सेंच्युरी करत वर्ल्ड रेकॉर्ड, पहिला सामना रद्द
संजू सॅमसन आणि ईशान किशन झटपट बाद झाल्यानंतर अभिषेक आणि कर्णधार अय्यरने ३८ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी रचली. अभिषेकने २४ चेंडूंत सहा चौकार व चार षटकारांसह ५९, तर श्रेयस अय्यरने ४७ चेंडूंत सहा चौकार व एका षटकारासह ६८ धावा केल्या. यानंतर शिवम दुबेने फटकेबाजी करून धावांचा वेग वाढवला, दुबेने २१ चेंडूंत तीन षटकार व दोन चौकारांसह नाबाद ४२ धावा केल्या.
Maharashtra TimesIND vs ENG 1st T20 : भारत आणि इंग्लंड पहिला टी-20 सामना सुरू, भारताची पहिली बॅटिंग, गंभीरच्या हुकमी एक्क्याचे कमबॅक
इंग्लंड (प्लेइंग 11): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (WK), हॅरी ब्रूक (C), जेकब बेथल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, साकिब महमूद, आदिल रशीद, ल्यूक वुड

भारत (प्लेइंग 11): संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन (WK), श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत