Headlines

आयर्लंडकडून वर्ल्ड कप विनर भारताचा पराभव, 2 खेळाडूंनी फिरवली संपूर्ण मॅच


मुंबई : भारत आणि आयर्लंडमधील पहिल्या टी-२० सामन्यांना वर्ल्ड कप विजेत्या भारताला आस्मान दाखवलं. या सामन्यामध्ये भारताची फलंदाजी ढेपाळली, आयर्लंडच्या १८३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १४८ धावांवर ऑल आऊट झाला. आयर्लंडने भारताला पहिल्यांदाच हरवत इतिहास रचला आहे. याआधी आयर्लंड भारताविरूद्ध कधीही पराभूत झाला नव्हता. भारताने हा सामना नेमका कुठे गमावला? टर्मिंग पॉइंट कोणता जाणून घ्या.

आयर्लंड संघाला भारतीय गोलंदाजांनी बॅकफूटला ढकलले होते. आयर्लंड संघाची ५१-४ विकेट अशी बिकट अवस्था झाली होती मात्र गॅरेथ डेलेनी आणि लॉर्कन टकर यांची ४४ चेंडूत ६४ धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली. कर्णधार टकरने ३६ चेंडूत ५० धावांची अर्धशतकी खेळी करत सामना फिरवला. त्यानंतर डेलेनी याने जॉर्ज डॉकरेलसोबत १६ चेंडूत ४९ धावांची आक्रमक भागीदार करत सामना आणखी फिरवला. भारताकडून १७ वी ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या प्रसिद्ध कृष्णाने या ओव्हरमध्ये २७ धावा बहाल केल्या. कुठेतरी सामना इथूनही भारताच्या हातून निसटला. डॉकरेलने २ चौकार आणि १ षटकारासह १९ धावांची आक्रमक खेळी केली.
Maharashtra TimesIND vs IRE: भारतानं टॉस जिंकला, गोलंदाजीचा निर्णय; संजू-अभिषेक ओपनिंगला, वैभवला संधी नाहीच, कॅप्टन अय्यर म्हणाला…
भारत बॅटिंगला उतरल्यावर दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला झटका बसला. संज सॅमसन ५ धावा करून परतला, त्यापाठोपाठ इशान किशन १ धाव, श्रेयस अय्यर ३ धावा, तिलक वर्मा १९ धावा, वॉशिंग्टन सुंदर २५ धावा करून आऊट झाले. शिवम दुबे याने २५ धावांची खेळी करत लढवय्या वृत्ती दाखवली होती. पण तोही २५ धावांवर आऊट झाला. भारताच्या पराभवामागे ढेपाळलेली फलंदाजी हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे. एकट्या अभिषेक शर्मा याने १९ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकार मारत अर्धशतकी खेळी केली होती. मात्र त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात तोही आऊट झाला. आयर्लंडकडून मॅथ्यू हॉलर्ड आणि मॅथ्यू हम्फ्रीज यांनी सर्वाधिक ३-३ विकेट घेत भारताला विजयापासून दूर ठेवले.
Maharashtra TimesINDW vs BANW : कॅच सुटले पण मॅच नाही! भारताने बांगलादेशला नमवलं, सेमीफायनलच्या आशा कायम, कोण ठरलं विजयाचा शिल्पकार?
दरम्यान, भारताच्या पराभवासाठी आयर्लंडचा कर्णधार टकर आणि गोलंदाज मॅथ्यू हॉलर्ड आणि मॅथ्यू हम्फ्रीज हे जबाबदार ठरले. भारताकडून आज वैभव सूर्यवंशीला खेळवलं जाईल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र त्याला आज संधी मिळाली नाही. दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेत यजमान आयर्लंड संघाने १-० ने आघाडी घेतली आहे.

आयर्लंड संघ : टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (C/W), बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फरीज, जय मुंद्रा, मॅथ्यू हॉलार्ड

भारतीय संघ : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (WK), इशान किशन, श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत