Headlines

आदर्श जोशी यांचा कॉलम:रस्त्यांबरोबरच ‘चालकां’चेदेखील भले होणे तितकेच गरजेचे‎




‎‎‎‎‎‎‎‎‎‎तुम्ही तुमच्या लेनमध्ये वाहन चालवत आहात. सुरक्षित‎अंतर राखले आहे आणि वाहनही निर्धारित वेगात आहे.‎इतक्यात अचानक दुसरे एखादे वाहन कोणतीही‎पूर्वसूचना न देता समोरून कट मारते. एखादा‎दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने येतो. एखादी कार‎महामार्गावरील बाहेर पडण्याचा मार्ग चुकल्यानंतर तिथेच‎रिव्हर्स घेऊ लागते. एखादा ट्रक वेगवान वाहनांसाठी‎असलेली लेन अडवून ठेवतो. इंडिकेटर केवळ‎दिखाव्यासाठी वापरले जातात. समोरून येणाऱ्या‎वाहनांवर हाय-बीमचा प्रकाश टाकून त्यांना अक्षरशः‎दिपवले जाते. वाहन चालवताना मोबाईलचा वापर‎केल्याने चालकाचे लक्ष रस्त्यावरून विचलित होते.‎ ही दृश्ये इतकी सामान्य झाली आहेत की आता त्यांचे‎आश्चर्यही वाटत नाही. अनेक बाबतीत ती भारतातील‎दैनंदिन वाहनचालक संस्कृतीचाच भाग बनली आहेत.‎एखादा गंभीर अपघात झाला की सार्वजनिक चर्चेचा‎केंद्रबिंदू बहुतेक वेळा रस्त्यांभोवतीच फिरत असतो.‎रस्त्यावर खड्डा होता का? महामार्गाच्या रचनेत दोष होता‎का? सुरक्षेसाठी आवश्यक कठडे नव्हते का? हे प्रश्न‎महत्त्वाचे आहेत. फलोदी अपघात प्रकरणात सर्वोच्च‎न्यायालयाने नुकतेच अशा अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधत‎महामार्गांची सुरक्षा सुधारण्याचे निर्देश दिले. महामार्ग‎व्यवस्थापन, अतिक्रमण, आपत्कालीन प्रतिसाद‎व्यवस्था,अपघात प्रतिबंधक उपाय अशा अनेक बाबींवर‎न्यायालयाने विचार केला. हा हस्तक्षेप आवश्यकच होता.‎कारण चांगले रस्ते, सुरक्षित महामार्ग आणि जलद‎आपत्कालीन सेवा अनेकांचे प्राण वाचवू शकतात. मात्र,‎या निर्णयामुळे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो—‎आपण वाहनचालकांकडेही तेवढेच लक्ष देत आहोत‎का? रस्ते सुरक्षिततेची सुरुवात महामार्गांपासून होत नाही‎तर एखाद्या व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवाना‎मिळतो तेव्हापासून होते. वाहनचालक परवाना हा‎सरकारकडून दिला जाणारा महत्त्वाचा अधिकार आहे.‎कारण तो एखाद्या व्यक्तीला क्षणार्धात मोठी हानी घडवू‎शकणारे वाहन चालविण्याची परवानगी देतो. मात्र‎प्रत्यक्षात वाहनचालक परवाना मिळविण्याची प्रक्रिया‎कौशल्य, निर्णयक्षमता व जबाबदारी यांचे मूल्यमापन‎करण्याऐवजी केवळ प्रशासकीय औपचारिकता बनली‎आहे. लेन शिस्त पाळली जात नाही. चुकीच्या बाजूने‎ओव्हरटेक करणे सामान्य झाले आहे. हे केवळ‎शिस्तभंगाचे प्रकार नाहीत. अनेक वाहनचालकांना हे‎नियम का आहेत, याचे योग्य प्रशिक्षणच मिळालेले नसते.‎वाहन सुरू करणे, गिअर बदलणे, रिव्हर्स घेणे किंवा‎पार्किंग करणे ही यांत्रिक कौशल्ये आहेत. मात्र सुरक्षित‎वाहनचालक होण्यासाठी जागरूकता, निर्णयक्षमता‎आणि शिस्त आवश्यक असते. संभाव्य धोके ओळखणे,‎सुरक्षित अंतर राखणे, लेन शिस्त पाळणे, ब्लाइंड‎स्पॉट्सची जाणीव ठेवणे आणि आपल्या प्रत्येक‎निर्णयाचा इतरांच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो, याची‎जाणीव असणे महत्त्वाचे आहे.‎ भारतात 2024 मध्ये 4.68 लाख रस्ता अपघात झाले.‎त्यात 1.75 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पैकी‎61 टक्क्यांहून अधिक अपघात अतिवेगामुळे झाले तर 26‎टक्के अपघात धोकादायक किंवा निष्काळजी‎वाहनचालक आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक‎केल्यामुळे घडले. बहुतांश अपघातांना ही दोन कारणेच‎जबाबदार आहेत. अनेक वर्षे आपण रस्ते कसे असावेत,‎यावर चर्चा केली. आता वाहनचालक परवाना हा खऱ्या‎अर्थाने पात्रतेचा पुरावा ठरेल. याची खात्री करण्याची वेळ‎आली आहे. वाहनचालक प्रशिक्षण व्यवस्थाही सक्षम‎हवी.‎ (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.)‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत